ETV Bharat / state

शिवरायांचे विचार संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी, युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे अयोग्य - शरद पवार - अनावरण

युगा-युगांमध्ये अशी एखादी व्यक्तीच जन्माला येते, त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar
author img

By

Published : Feb 20, 2019, 11:12 AM IST

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण मानवजात आणि समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. युगा-युगांमध्ये अशी एखादी व्यक्तीच जन्माला येते, त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. लोणी काळभोर परिसरातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, भारतात अनेक राज्ये होऊन गेले, त्यांना त्यांच्या घराण्याने ओळखले जाते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या नावाने ओळखले जाते. ते रयतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन केले. त्यांना दूरदृष्टी, आधुनिकता, भविष्यवेध, कर्तत्व याची जाण होती. हा शेतकऱ्यांचा राजा होता. शिवाजी महाराज भारतातले, असे एकटे राजे होते ज्यांनी सागरी मार्गाचा उपयोग केला. त्यांनी संकटांना ओळखून सागरी आरमार उभे केले. त्यांनी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले होते. धर्मा-धर्मात त्यांच्या विचारांची संकुचितता सांगितली जात असेल तर ते चालणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.

undefined

Intro:छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात व समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांसाठी केली जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगा युगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, कोल्हापूरची श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.

Body:शरद पवार म्हणाले भारतात अनेक राजे होऊन गेले व त्यांना त्यांच्या घराण्याने ओळखले जाते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या नावाने ओळखले जाते. ते रयतेचे राजे असून त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन केले. त्यांना दूरदृष्टी, आधुनिकता, भविष्यवेध, कर्तत्व होते. हा शेतकऱ्यांचा राजा होता. शिवाजी महाराज भारतातले असे एकटे राजे होते ज्यांनी सागरी मार्गाचा उपयोग केला. त्यांनी संकटांना ओळखून सागरी आरमार उभे केले. समाज आणि राज्य यांचा समन्वय साधला. त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले त्यांच्या सैन्यदलात मुस्लिम सहकारी होते त्यांचा उपयोग त्यांनी राज्य चालवण्यासाठी केला. धर्माधर्मात त्यांच्या विचारांची संकुचितता सांगितली जात असेल तर ते चालणार नाही.

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.