पुणे - भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्यांचे नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. जीव वाचवण्यासाठी धावत असताना रस्त्यावर पडल्याने खंडेलवाल जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशाल खंडेलवाल हे देहूरोड कँन्टोमेंट बोर्डाचे भाजपचे नगरसेवक आहे. त्यांच्यावर अचानक अज्ञातांनी गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस अज्ञात २ व्यक्तींचा शोध घेत आहेत. अद्याप हा हल्ला का करण्यात आला हे समजू शकले नाही.
![pimpri chinchwad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpunfiringoncorporater2019av7201348_13062019213337_1306f_1560441817_157.jpg)
विशाल खंडेलवाल हे त्यांच्या देहूरोड बाजारपेठेतील कार्यालयाच्या बाहेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, ती सुदैवाने त्यांना न लागल्याने ते थोडक्यात बचावले. जीव वाचवण्यासाठी ते धावत सुटले त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यात पडले आणि किरकोळ जखमी झाले.
![pimpri chinchwad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhpunfiringoncorporater2019av7201348_13062019213337_1306f_1560441817_846.jpg)