ETV Bharat / state

Amit Shah News:आरएसएसचे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अमित शाह यांनी घेतले अंत्यदर्शन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी सोमवारी पुण्यात निधन झाले. आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित आहेत.

Amit Shah News
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Jul 25, 2023, 7:32 AM IST

Updated : Jul 25, 2023, 12:04 PM IST

आरएसएसचे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच पूर्व सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवावर पुण्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत. संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर अंत्यविधीसाठी उपस्थित असणार आहेत. सकाळी 9 ते 11 दरम्यान मदनदास देवी यांचं पार्थिव मोतीबाग संघ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे.

आरएसएसचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

वृद्धापकाळाने निधन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मदनदास देवी हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच थांबले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वारच्या पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर उपचारही करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निधनावर शोकसंदेश : देवी यांच्या निधनावर सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शोकसंदेश पाठविला आहे. मदनदास देवी यांच्या जाण्याने आमचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शारीरिक अस्वस्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. आज पहाटे त्यांच्या या संघर्षाचा आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद अंत झाला आहे. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वर्गीय यशवंतराव केळकरजी यांच्या सहवासात त्यांनी संघटनकलेच्या गुणवत्तेला परिपूर्ण रूप दिले, असे या संदेशात म्हटले आहे.

थोडक्यात जीवनप्रवास : मदनदास देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला. सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव करमाळा हे आहे. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1959 मध्ये प्रवेश घेतला. एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्यात शिक्षण घेत असतानाच वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला.

मोदींचा शोकसंदेश : ते 1969 पासून संघ प्रचारक होते. अभाविपमध्ये त्यांनी 1975 पासून कामास सुरूवात केली. तेथे ते विभाग, प्रदेश व क्षेत्रीय अशा जबाबदाऱ्यांनंतर त्यांनी संघटन मंत्री म्हणूनही काम केले. महाविद्यालय- शहर पातळीवर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील, यासाठी विशेष लक्ष देत त्यांनी संघटनकार्याचा पाया रचला. अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या पिढ्या त्यांनी घडविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे, की मदनदास देवी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले. दुःखाच्या या प्रसंगी ईश्वर सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो. ओम शांति!:

हेही वाचा :

  1. Madan Das Devi passed away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मदनदास देवी यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख
  2. Patna Opposition Meeting: विरोधकांची एकजूट कधीच शक्य नाही, पाटणामध्ये फोटो सेशन आहे - अमित शाह
  3. Sahara Refund Portal Launch : सहारात अडकलेले पैसे मिळवून देण्याकरिता अमित शाह यांच्याकडून पोर्टल लाँच, 'अशी' आहे प्रक्रिया

Last Updated : Jul 25, 2023, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.