ETV Bharat / state

ईडीचा वापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न - शरद पवार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे विधानपरिषदेतील आमदाराच्या यादीतून नाव कापल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही बोलायचे नाही.

sharad pawar
शरद पवार
author img

By

Published : Sep 4, 2021, 8:07 PM IST

Updated : Sep 5, 2021, 9:47 AM IST

पुणे - केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही केला जात आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या हस्ते आज (शनिवारी) पुण्यातील एका शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, ईडीचा गैरवापर अशाप्रकारे यापूर्वी कधीही झाला नव्हता. मात्र, आताच्या सरकारने विरोधकांना नमवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली. मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि दक्षिणेतील इतर काही राज्यात या माध्यमाचा गैरवापर सुरू आहे.

राजू शेट्टींबद्दल बोलायचे नाही...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे विधानपरिषदेतील आमदाराच्या यादीतून नाव कापल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. परंतु या जास्त काही चर्चा सुरू आहेत यात कुठलीही तथ्य नाही. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेती क्षेत्रात जे काम केले आहे ते पाहून त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे केला आहे. आता अंतिम निर्णय राज्यपालांना घ्यायचा आहे. राजू शेट्टी काय म्हणाले याबद्दल मला काही बोलायचं नाही. आम्ही आमचा शब्द पाळला आहे, आता आम्ही राज्यपालांच्या निर्णयाची वाट बघत आहोत.

हेही वाचा - नायर रुग्णालयाला 100 कोटी देणार; शताब्दी महोत्सवाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

अनेकांची मतं वेगळी -

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शक तत्त्व दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यावी, अशी सूचनादेखील केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकार त्या सूचनांचे पालन करत आहे. मात्र, अनेकांची याबद्दल वेगळी मतं असू शकतात. त्यांना तो मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

हरयाणामधील घटना दुर्दैवी -

हरयाणामध्ये उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केल्याचा घटनेवर विचारले असता शरद पवार म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यावर अशाप्रकारे लाठीचार्ज करणं ही गंभीर बाब आहे. थंडी ऊन आणि पावसाचा विचार न करता मागील अनेक महिन्यांपासून हे शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्यकर्त्यांनी संवेदनशीलपणा दाखवत आंदोलक शेतकऱ्यांची दखल घ्यायला हवी होती. मात्र, राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, हे दुर्दैव असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

Last Updated : Sep 5, 2021, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.