ETV Bharat / state

चोरांना पाहून पोलीस पळतात ही दुर्दैवी घटना- अजित पवार

कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली आहे.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Jan 8, 2021, 2:55 PM IST

Updated : Jan 8, 2021, 3:05 PM IST

पिंपरी (पुणे) - पुण्यात पोलिसांच्या प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना घडली असून चोर आले. म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी व्यक्त केले आहे. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते, अस त्यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, महापौर माई उर्फ उषा ढोरे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

अजित पवार
चोर आले म्हणून पोलिसच पळून जातात-उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली आहे. चोरांना घाबरून रात्र गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळ काढला पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात, हे अस करता कामा नये,"अश्या घटना होऊ नयेत म्हणून वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे-अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते. पोलिसांच्या मनोबलावर याचा वाईट परिणाम होतो. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याची नोंद सर्वांनी घ्यायला हवी. अश्या घटना पुन्हा घडू नयेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहीजे, असे अजित पवार म्हणाले आहेत. पोलिसांच्या कामगिरीची नोंद इतिहासात घेतली जाईल-पुढे ते म्हणाले की, कोरोना काळात जोखीम पत्करून केलेल्या कामाला तोड नाही. ते कर्तव्य पार पाडत असताना पोलीस बांधवांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात घेतली जाईल.

गुन्हेगारीचे साइड इफेक्ट बंद झाले पाहिजे-

शहरातील गुन्हेगारीचे साइड इफेक्ट बंद झाले पाहिजेत. शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष. गुंडांकडून होणार त्रास थांबला पाहिजे. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगतो की तो कुठल्या पक्षाचा, गटाचा, याचा विचार न करता महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी देखील गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्या बरोबर आहे, अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा, मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो. माझी मत आणि भूमिका स्पष्ट असते, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच

Last Updated : Jan 8, 2021, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.