ETV Bharat / state

मतांच्या राजकारणासाठी बैलगाडा शर्यतीचे भांडवल करु नका, बैलगाडा शर्यतबंदी मीच उठवणार -उद्धव ठाकरे

विरोधक या बैलगाडा शर्यतबंदीचे भांडवल करून मते मागुन दिशाभुल करत आहेत. पुढील काळात ही बैलगाडा शर्यत बंदी सरकारच्या माध्यमातून मीच उठवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

बैलगाडा शर्यतबंद मीच उठवणार -उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 26, 2019, 8:27 AM IST

Updated : Apr 26, 2019, 2:21 PM IST

पुणे - शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बैलगाडा शर्यत. ही बैलगाडा शर्यत बंद असताना शेतकऱ्यांसह शिवसेनेने या बंदीविरोधात मोठा लढा दिला आहे. मात्र, विरोधक या बैलगाडा शर्यतबंदीचे भांडवल करून मते मागुन दिशाभुल करत आहेत. पुढील काळात ही बैलगाडा शर्यत बंदी सरकारच्या माध्यमातून मीच उठवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. काल (२५ एप्रिल) चाकण येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

मतांच्या राजकारणासाठी बैलगाडा शर्यतीचे भांडवल करु नका, बैलगाडा शर्यतबंदी मीच उठवणार -उद्धव ठाकरे

निवडणुकीच्या रिंगणात मतांचे राजकारण सुरू असताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार जनतेला हवा असतो. मात्र, हाच खासदार सिनेमा, नाटक किंवा मालिकेत काम करणारा असेल, तर तो जनतेचे प्रश्न कसा सोडवणार, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर उपस्थित केला.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत शिरूर लोकसभेमध्ये आमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. तर, दुसरीकडे यांच्याजवळ पंतप्रधानपदासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे मते कुणाच्या नावावर मागता, असे खडे बोलही त्यांनी लगावले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून निशाणा साधला. मालिकेच्या माध्यमातून भगव्याची निष्ठा शिकवली जाते. मग स्वतः जवळची निष्ठा कुठे जाते, असा टोला त्यांनी लगावला.

आपल्या देशावर झालेल्या दहशत दहशतवादी हल्ल्यानंतर युतीच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक केले. यामध्ये आपल्या जवानांचे शौर्य हे महत्त्वाचे होते. आता याच सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करताना तुम्हाला लाज तरी का वाटत नाही? असेही ते म्हणाले.

Intro:Anc__ शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बैलगाडा शर्यत ही बैलगाडा शर्यत बंद असताना शेतकऱ्यांसह शिवसेनेने या बंदीविरोधात मोठा लढा दिला आहे मात्र विरोधक बैलगाडा शर्यतबंदीचे भांडवल करून मतं मागुन दिशाभुल करत असुन पुढील काळात ही बैलगाडा शर्यत बंदी सरकारच्या माध्यमातून मीच उठवणार असल्याचे आज चाकण येथील शिवाजीराव आढळरावपाटलांच्या विजय संकल्प मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.

निवडणुकीच्या रिंगणात मताच्या राजकारण करत असताना सामान्य जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार जनतेला हवा असतो मात्र हाच खासदार सिनेमात मालिकेत नाटकात काम करणारा असेल तर तो जनतेचे प्रश्न कसे सोडवणार असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी जनतेला विचारल्यानंतर विचारून आम्हाला जनतेत राहुन मतदार संघात रहावुन आमचे प्रश्न सोडविणारा खासदार हवा असं म्हणत सभेतील जनतेने शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटलांना विजयाचा रस्ता मोकळा करून दिला

सभेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, व कॉग्रेसला लक्ष्य करत शिरूर लोकसभेमध्ये आमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता तर दुसरीकडे यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवारच नाही आणि म्हणे युतीने देशाच्या कारभाराची वाट लावून टाकली त्यामुळे आम्हाला देशाचा कारभार सुधारायचा मात्र देश सुधारायला निघालेल्यांकडे पहिला उमेदवार शोधण्याची वेळ आली असताना मतं तरी कुणाच्या नावावर मागता असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला

प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा मी आघाडीचे वर्णन बिनबुडाचे आघाडी असं करत होतो मात्र नंतर लक्षात आलं की माझच काही तरी चुकतय मात्र या आघाडीमध्ये बुडं खुप आहेत पण चेहराच नाही या आघाडीमध्ये सर्वांनाच वाटतंय पंतप्रधान होऊन पंतप्रधानपदाच्या खुर्चीत आपलं बुड टेकवावं आरे हा काय संगीत खुर्चीचा खेळ आहे का असा संतप्त सवाल सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

जसा आम्ही ती मालिका बघून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज समजले तसे या मालिकेत काम करणाऱ्या कलाकार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा आपल्या मालिका बघून निष्ठा कशाला म्हणतात हे शिकण्याची गरज आहे मालिकेच्या माध्यमातून भगव्याची निष्ठा शिकवली जाते मग स्वतः जवळचे निष्ठा कुठे जात असल्याचा सवाल डॉक्टर अमोल कोल्हे यांना उद्धव ठाकरे यांनी भरसभेत विचारला भगव्याची निष्ठा तुम्ही सांगण्याची गरज नाही शरद पवारांचा माणूस म्हणून समोर ये मग समोरासमोर पाहून घेऊ असा सज्जड दमही उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोल्हेंना दिला

आपल्या देशावर झालेल्या दहशत दहशतवादी हल्ल्यानंतर युतीच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक केलं यामध्ये आपल्या जवानांचे शौर्य हे महत्त्वाचे होते आणि आता याच सर्जिकल स्ट्राइक वर शंका उपस्थित केल्या जात आहेत मात्र जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करताना तुम्हाला लाज तरी का वाटत नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी चाकण येथील शिवाजी आढळराव पाटील यांच्या विजय संकल्प सभेमध्ये केला

Byte __उद्धव ठाकरे__शिवसेना पक्षप्रमुख.Body:Byte __उद्धव ठाकरे__शिवसेना पक्षप्रमुख.Conclusion:
Last Updated : Apr 26, 2019, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.