ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करणारे उच्चशिक्षित तरुण अटकेत - पोलीस कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन उच्च शिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेला गांजा
author img

By

Published : May 2, 2019, 11:50 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या उच्च शिक्षित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणांकडून ३५ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले दोन्हीही तरुण उच्चशिक्षित आहेत. यातील एकाने अभियांत्रिकीचे आणि एकाने फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहेत. याप्रकरणी योगेश दत्तात्रेय जाधव आणि सागर दिगंबर कदम या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश हा इंजिनिअर असून सागर याने फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहे. विक्रीसाठी आणलेला गांजा विशाखापट्टणम येथून मागवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्यासह त्यांचे सहकारी कर्मचारी गस्त घालत होते. पथकातील एका कर्मचाऱ्याला द्रुतगती मार्गावर गांजा विक्रीसाठी दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बिटवाईज कंपनी येथे दोघे जण संशयितरित्या उभे होते. त्यांना अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याने सापळा रचून ताब्यात घेतले. पाच गोण्यात ऐकून १५० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

Intro:mh pune 02 02 ganjaa sized av 7201348Body:mh pune 02 02 ganjaa sized av 7201348

anchor
पिंपरी चिंचवड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या उच्च शिक्षित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच ३५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून हे दोघे तरुण इंजिनिअर आणि फार्मसी चे शिक्षण घेतलेले आहेत...गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या या दोन उच्चशिक्षत तरुणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल ३५ लाख रुपयांचा १५० किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी योगेश दत्तात्रेय जोध आणि सागर दिगंबर कदम या दोघांना ताब्यात घेतलं आहे. योगेश हा इंजिनिअर असून सागर याने फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहे. विक्रीला आणलेला गांजा विशाखा पट्टणम येथून आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलीस निरीक्षक श्रीराम पौळसह त्यांचे सहकारी कर्मचारी गस्त घालत होते. पथकातील एका कर्मचाऱ्याला द्रुतगती मार्गावर गांजा विक्रीसाठी दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बिटवाईज कंपनी येथे दोघे जण संशयितरित्या उभे होते. त्यांना अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याने सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पाच गोण्या मध्ये ऐकून १५० किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. दरम्यान संबंधीत आरोपी हे उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे अधिक तपास पोलीस करत आहेत..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.