पुणे - स्वच्छता कर्मचारी व महानगरपालिकेतील मृत कर्मचाऱ्याचा गणवेश घालून गांजा खरेदी करणाऱ्या दोघा तोतयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा धक्कादाय प्रकार हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.
येथील ऋषी रवींद्र मोरे आणि त्याचा एक मित्र, अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना विचारणा केली असता ऋषी हा पुणे महापालिकेच्या एका मृत कर्मचाऱ्याचा गणवेश घातला होता आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने स्वच्छता कर्मचाऱ्याचा गणवेश घालून गांजा खरेदी करून घराकडे निघाले होते. त्यावेळी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांना दोघांवर संशय आला. त्यावेळी त्यांची झडती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोघांवर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर करडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.
याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा घेण्यासाठी ते दोघे गेले होते. त्या ठिकाणी 10 ते 15 जण खरेदीसाठी आले होते आणि तीघे गांजाची विक्री करत होते, असे ऋषीने सांगितले. पण, या टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचा - दौंडमध्ये गावठी दारु अड्डयांवर पोलिसांचा छापा, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त