ETV Bharat / state

परदेशी तरुणींचा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय; वाकड पोलिसांनी केले जेरबंद

author img

By

Published : Jul 18, 2020, 6:52 AM IST

शहरातील काही भागात परदेशी तरुणी आणि महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची गंभीर बाब वाकड पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी युगांडा येथील 25 आणि 40 वर्षीय महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना अतुल देवतळे यांनी फिर्याद नोंदवली.

वाकड पोलीस
वाकड पोलीस

पुणे - जिल्ह्यात शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना शहरातील काही भागात परदेशी तरुणी आणि महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची गंभीर बाब वाकड पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी युगांडा येथील 25 आणि 40 वर्षीय महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना अतुल देवतळे यांनी फिर्याद नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी 25 वर्षीय तरुणी आणि 40 वर्षीय महिला पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात व्हॉट्सऍपद्वारे वेश्या व्यवसाय करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एकीकडे कोरोनासारख्या महामारी विरोधात लढत असताना, असे प्रकार घडणे गंभीर मानले जात आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भाड्याने राहात असलेल्या खोलीत दिवसाढवळ्या हा प्रकार चालत होता. परंतु, याची माहिती वाकड पोलिसांना मिळताच तातडीने खात्री करून संबंधित महिला आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी महिला आणि तरुणी वेश्या व्यवसाय करून उपजीविका भागवत असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, त्याची भारतात राहण्याची व्हिसाची मुदत संपली असताना बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.