पुणे - दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तपणे केली आहे.
सादिया अन्वर शेख (वय 21 वर्षे) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय 27 वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सादिया शेख हिला येरवडा परिसरातून तर नबील खत्री याला कोंढवा परिसरातून अटक करण्यात आली आहे.
यापूर्वीही सादिया शेख हिला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तर नबील खत्री हा दिल्लीतील एका अतिसंवेदनशील प्रकरणात फरार आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे.
एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि ATS ( दहशतवाद विरोधी पथक) यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत रविवारी (दि. 12 जुलै) सायंकाळच्या सुमारास या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - जुन्नर येथे वधू-वरासह 35 जण कोरोनाबाधित