पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मास्कचा तुटवडा जाणवत असताना मास्कचा काळाबाजार करणाऱ्या पुण्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भुपेश ओमप्रकाश गुप्ता आणि रोहन अजय शुक्ला अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
आरोपींच्या ताब्यातून 4 लाख 30 रुपये किमतीचे 17805 मास्क हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील भुपेश गुप्ता याच्या मालकीचे लिंक एंटरप्राइजेस हे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मास्कचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
आरोपींच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना एन - 95 मास्कचा मोठा साठा आढळला. ठरविलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने मास्क विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवरही आवश्यक वस्तू व कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.