ETV Bharat / state

दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण - Two people found corona positive in pune

या दोन रुग्णांनंतर आता भारतातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे.

Two people found positive for Corona Virus in pune
दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण
author img

By

Published : Mar 10, 2020, 1:48 AM IST

Updated : Mar 10, 2020, 7:50 AM IST

पुणे - कोरोना विषाणुची दहशत जगभरात पसरत असताना भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पंजाब आणि कर्नाटक नंतर आता महाराष्ट्रातही कोरोना विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण दुबईहून परतले होते. या दोघांनाही पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण

पुण्यातील पती - पत्नी एक तारखेला दुबईवरुन पुण्यात आले. हे दोघे एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते. मात्र, 1 तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले. मात्र, आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती पत्नी तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमधे पोहचले.

हेही वाचा -महाराष्ट्रातील दोघांना कोरोना विषाणूची लागण, देशभरात एकूण ४७ रुग्ण..

त्यानंतर त्यांचे नमुणे तपासणीसाठी एन.आय.व्ही कडे पाठवण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आढळली. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. दुबईमध्येही कोरोनाची लागण झाल्याचे तोपर्यंत दिसून आलेले नव्हते. त्यामुळे या दोघांबरोरच ते ज्या 40 जणांबरोबर दुबईला गेले होते, त्यापैकी कोणाचीही तपासणी करण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. मात्र, आता हे पती पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ते ज्या 40 जणांसोबत गेले होते त्यांचीही तपासणी करावी लागणार आहे. त्याचसोबत ते मागील 8 दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील, त्यांचाही शोध घ्यावा लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -कर्नाटक अन् पंजाबमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण, देशात आतापर्यंत ४५ जणांना लागण..

Last Updated : Mar 10, 2020, 7:50 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.