ETV Bharat / state

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेंच्या दोन आलिशान गाड्या जप्त - Pune Shivajirao Bhosale Co-operative Bank news

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार भोसले यांच्यासह 16 जणांविरुद्ध 135 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सात महिन्यांपासून आमदार भोसले तुरुंगात आहेत. त्यांच्या आणखी दोन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. भोसले यांच्या आणखी काही मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव लवकरच सरकारकडे पाठवला जाणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

आमदार अनिल भोसले आर्थिक गैरव्यवहार न्यूज

author img

By

Published : Sep 29, 2020, 7:11 PM IST

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या आणखी दोन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसलेंच्या दोन आलिशान गाड्या जप्त
शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार भोसले यांच्यासह 16 जणांविरुद्ध 135 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मागील सात महिन्यांपासून आमदार भोसले तुरुंगात आहेत.

हेही वाचा - चिमुकल्याचे अपहरण करून 70 हजाराला सौदा; पोलिसांनी 'असा' शोध घेत केली 5 जणांना अटक

दरम्यान, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास आहे. या प्रकरणाच्या तपासाला आता गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही भोसले यांच्या काही मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी आणखी तपास सुरू असून भोसले यांच्या आणखी काही मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव लवकरच सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

हेही वाचा - अमली पदार्थांचे 'या' मार्गे होत आहे बॉलिवूडमध्ये पुरवठा; मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.