पुणे - दोन सराईत गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांकडून दोन वर्षांकरता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया (वय-३५) असे एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या महाकालीच्या भावाचे नाव आहे तर जोयेल भास्कर पिलाणी (वय-२०) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. दोघांवर ही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
![Two felonies charged with serious offenses in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5118498_asd.png)
हेही वाचा - Ind Vs Wi : २१ नोव्हेंबरला टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची जागा 'हा' खेळाडू घेणार
कुख्यात कुंड महाकाली याचा काही वर्षांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा सख्खा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या हा गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, विनयभंग, आर्म ऍक्ट आणि दरोडा टाकणे, जाळपोळ, वाहनांची तोडफोड, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जोयेल भास्कर पिलाणी याच्यावर देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडा घालणे, जाळपोळ करणे, दंगल करून वाहनांची तोडफोड करणे असे गुन्हे पिलाणी याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे दोघांवर तडीपार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. दोघेही देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लोकांमध्ये या गुंडांची दहशत निर्माण होऊ लागल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोळी कर्मचारी प्रमोद सात्रस, अनिल जगताप, महिला पोलीस कर्मचारी नूतन कोंडे यांनी केली आहे.