ETV Bharat / state

दौंड येथे सापडले दोन तोतया परीक्षार्थी, चौघांविरोधात गुन्हा दाखल

दहावीच्या मराठी विषयाचा पेपर देताना दोन तोतया परीक्षार्थी आढळून आले. यामुळे तोतया व मुळ परीक्षार्थी, अशा चौघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलीस ठाणे
दौंड पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 21, 2020, 7:01 PM IST

दौंड (पुणे) - तालुक्यातील दौंड-पाटस रस्त्यावरील मेरी मेमोरियल स्कूल येथे इयत्ता दहावीची परीक्षा देताना दोन तोतया परीक्षार्थीआढळून आले आहेत. याबाबत दौंड पोलीस ठाणे येथे दोन परीक्षार्थी आणि त्यांच्या जागी परिक्षा देणाऱ्यां दोन तोतया परीक्षार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

इयत्ता 10वीची ऑक्टोबरमध्ये होणारी परीक्षा दिनांक 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे . दिनांक 20 नोव्हेंबरला मराठी भाषा विषयाचा पेपर सुरू असताना हॅाल क्रमांक एकमध्ये मयूर प्रकाश कापरे (रा. पिंपळगांव, ता. दौंड) या परीक्षार्थीच्या जागी मयुरी उर्फ पल्लवी प्रकाश कापरे (वय 19 वर्षे, रा. पिंपळगांव, ता. दौंड) ही परीक्षा देत असल्याचे पर्यवेक्षक नसरीन शब्बीर कुरेशी यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत प्राचार्या मनीषा जोसेफ सोलेमन यांना माहिती दिली.

तर हॉल क्रमांक दोनमध्ये पर्यवेक्षिका प्रीयवदा नितीन कांबळे यांनी प्राचार्या मनीषा जोसेफ सोलेमन यांना परीक्षार्थी गणेश दत्तोबा भोसले (रा. केडगाव, ता. दौंड) याच्या जागी बाळू शिवाजी भोसले (वय 22 वर्षे, रा. सिद्धटेक, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा परीक्षा देताना आढळून आल्याची माहिती दिली.

प्राचार्या मनीषा जोसेफ सोलेमन यांनी परीक्षार्थी अभिलेखाची पाहणी केली असता त्यांना तोतया परीक्षार्थी परीक्षा देत असल्याचे लक्षात आले . यावेळी परीक्षा केंद्रावरील विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांनी तोतया परीक्षार्थींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तोंडी आदेश दिले.

चौघांवर गुन्हा दाखल

मेरी मेमोरियल स्कूलच्या प्राचार्या मनीषा जोसेफ सोलेमन यांनी तोतया परीक्षार्थी प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात येथे मयुर प्रकाश कापरे, मयुरी उर्फ पल्लवी प्रकाश कापरे, गणेश दत्तोबा भोसले, बाळू शिवाजी भोसले या चौघांविरोधात तक्रार दिली. यावरून चौघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.