दौंड पुणे पाटस गावठाण येथील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सुमारे ५ श्वानांवर अज्ञात व्यक्तीने एका वेगळ्या प्रकारचे रसायन(केमिकल) टाकून जीवे मारण्याचे अमानुष क्रूर कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. असे अमानुष कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे .
पाच श्वानांवर हा केमिकल हल्ला दौंड तालुक्यातील पाटस गावातील गावठाण परिसरातील आठ दिवसापासून एक ते दोन दिवसाआड सुमारे पाच श्वानांवर हा केमिकल हल्ला करण्यात आला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. विशिष्ट प्रकारचे केमिकल श्वानांच्या अंगावर टाकले जाते त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात भाजते. अंगाचे अक्षरशः चगदे निघतात आणि तडफडून त्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यात दोन दिवसांपूर्वी दोन श्वानांना उपचरा आधीच प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या आठवडे पासून पाटस गावात हे अमानुष 'केमिकल हल्ला सत्र' मुक्या जनावरांच्या जीवावर उठले असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांकडून पाटस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार पीडित श्वानांवर डॉ खंडेराव जगताप यांनी उपचार केले आहेत. याकामी वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे स्वयंसेवक ऋग्वेद रोकडे, महेश पवार डॉ खंडेराव जगताप हर्षद बंदिष्टी,अक्षय टिक्के ,ओंकार पंडित,सुनील पाटणकर,चैतन्य बंदीष्टी,अर्णव रंधवे,अनिकेत बंदिष्टीं, यज्ञेश बंदिष्टी, सुयोग कुलकर्णी, केतन दोशी गौरव कुलकर्णी यांनी विशेष पुढाकार घेत पीडित श्वानांवरील पुढील उपचाराची जबाबदारी घेतली आहे. ग्रामस्थांनी सदर घटनेची पाटस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. लवकरात लवकर असे अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.