पुणे - वाफ घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, अथवा कोरोनाचा संसर्ग लवकर बरा होतो, अशी अफवा सध्या शहरात पसरली आहे. या अफवेवर विश्वास ठेऊन वाफ घेण्याची कृती करत असताना उकळते पाणी अंगावर सांडल्याने दोन चिमुरडे भाजल्याच्या २ घटना घडल्या शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत. दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिल्या घटनेत सहा वर्षाचा चिमुरड्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे तो घरातच पातेल्यात उकळते पाणी घेऊन वाफ घेत असताना ही दुर्घटना घडली. उकळते पाणी या चिमुरड्याच्या अंगावर सांडल्याने त्याच्या पोटाचा भाग दोन्ही मांड्या आणि पाय गंभीररीत्या भाजले आहेत. भाजल्यानंतर त्याला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर अन्य एका घटनेत चार वर्षाची चिमुरडी अशाचप्रकारे वाफ घेताना भाजली. याच चिमुरडीच्या घरातील आई-वडील, मावशी आणि आजोबा यांना करोनाची बाधा झालेली आहे. सौम्य लक्षणे असल्यामुळे हे सर्व घरातच क्वारंटाईन आहेत. काही दिवसांपूर्वी वाफ घेत असताना उकळते पाणी अंगावर सांडल्याने ही चिमुरडी भाजली होती. दहा दिवसाचा उपचारानंतर ही चिमुरडी कोणाच्या आजारातून बरी झाली. परंतु ही भाजलेली जखम जाण्यासाठी आणखी काही अवधी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दोन्ही चिमुरड्यांवर ससून रुग्णालयातील नव्याने बांधण्यात आलेल्या कोविड केअर इमारतीत प्लास्टिक सर्जरी आणि बालरोग विभागाने मिळून उपचार केले. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या भाजलेल्या जखमा हळूहळू सुधारत गेल्या. त्यामुळे वाफ घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
वाफ घेतल्याने कोरोना होत नसल्याची अफवा; उकळते पाणी सांडल्याने दोन चिमुरडे भाजले - वाफ घेताना उकळत्या पाण्याने मुले जखमी
वाफ घेतल्याने कोरोना होत नाही किंवा कोरोना बरा होतो, अशा अफवेतून प्रयोग करताना दोन चिमुरड्यांना उकळते पाणी पोळल्याची घटना घडली आहे. दोन्ही मुलांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.