ETV Bharat / state

बारामती पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या, पाच दुचाक्या जप्त - baramati crime news

बारामती शहर पोलिसांनी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 4 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक चोरटे अन जप्त मुद्देमालासह पोलीस पथक

author img

By

Published : Dec 28, 2020, 8:08 PM IST

बारामती (पुणे) - बारामती शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दोन चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चार लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चैतन्य पांडूरंग शेळके वय 19 वर्षे), किशोर सहदेव पवार (वय 19 वर्षे, दोघे रा. धोत्रा, ता.परांडा, जि.उस्मानाबाद), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील इंदापूर रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, येथील मोतीबाग चौकात चैतन्य व किशोर हे दोघे बुलेटवरुन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकून त्यांच्याकडे बुलेटच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली. मात्र, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दोघांना पोलीसी खाक्या दाखवताच बुलेट बारामतीतील कसबा येथून 24 डिसेंबरला चोरल्याचे त्यांनी कबूल केले.

पाच दुचाक्या जप्त

अटकेत असलेल्या आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता बीड जिल्ह्यातील आष्टी, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच दुचाक्या हस्तगत गेल्या आहे. अटक आरोपींविरोधात बारामती शहर, बारामती तालुका व आष्टी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - नगररचना विभागाचे हनुमंत नाझिरकरांवर गुन्हा दाखल

हेही वाचा - ...तर वारकरी संप्रदाय करणार पाच वर्षे मोफत किर्तन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.