ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून बलात्कार; आरोपी अटकेत

पीडित अल्पवयीन मुलीला अंधाराचा फायदा घेऊन नराधम आरोपीने त्याच्या साथीदाराने मदतीने घटनास्थळी बोलावून नेले. त्याठिकाणी तिला अश्लिल व्हिडिओ दाखवत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pune crime news
Pune crime news
author img

By

Published : Aug 3, 2020, 2:42 PM IST

शिरुर(पुणे) - अल्पवयीन मुलीला मंदिराच्या मागे नेऊन अश्लिल व्हिडिओ दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडली आहे. आरोपीने पीडितेला मारहाण केली असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नराधम तरुणासह मदतीला असणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी घराजवळून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी व नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला असता, ती एक मंदिराच्या बाजूला रडताना आढळून आली. त्यावेळी तिच्याकडे विचारणा केली असता, पीडित मुलीने आपल्या आईला घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात तक्रार दाखल केली.

पीडित अल्पवयीन मुलीला अंधाराचा फायदा घेऊन नराधम आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने घटनास्थळी बोलावून नेले. त्याठिकाणी तिला अश्लिल व्हिडिओ दाखवत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनंतर तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलिसांनी नराधम आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या साथीदाराला अटक केली आहे.

दरम्यान पुण्याच्या ग्रामीण भागात बलात्कार, हत्या अशा घटनांमध्ये वाढ होत असून पुढील काळात अशा घटना रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.