ETV Bharat / state

कार्ला येथील एकवीरा मंदिराचा कळस चोरी करणाऱ्या दोघांना अटक; लपवून ठेवलेला कळसही जप्त - चोरी

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी लोणावळ्यातील एका तलावाजवळ लपवून ठेवलेला कळस जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्यांना पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील
author img

By

Published : May 7, 2019, 8:02 PM IST

पुणे - कार्ला येथील एकवीरा मंदिराचा कळस चोरी करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक केली आहे. तसेच त्यांनी लोणावळ्यातील तलावाजवळ लपवून ठेवलेला कळसही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राहुल गावडे आणि सोमनाथ गावंडे अशी त्यांची नावे आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील

संदीप पाटील म्हणाले की, राहुल गावडे आणि सोमनाथ गावंडे (वय २४, रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ३ ऑक्टोबर २०१७ रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी लोणावळ्यातील एका तलावाजवळ लपवून ठेवलेला कळस जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्यांना पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मंदिरात झालेल्या चोरीमुळे मावळातील राजकारण चांगलेच तापले होते. पोलिसांनीही याप्रकरणातील संभाव्य कटकारस्थानाचा तपास करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात विधानसभा अधिवेशनातही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अखेर दोन वर्षानंतर पुणे ग्रामीण पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

Intro:पुणे - कार्ला येथील एकवीरा मंदिराचा कळस चोरी करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी लोणावळ्यातील तलावाजवळ लपवून ठेवलेला कळसही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Body:संदीप पाटील म्हणाले की, राहुल गावडे आणि सोमनाथ गावंडे (वय 24, रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 3 ऑक्टोबर 2017 रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.

त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान त्यांनी लोणावळ्यातील एका तलावाजवळ लपवून ठेवलेला कळस जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्यांना पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मंदिरात झालेल्या चोरीमुळे मावळातील राजकारण चांगलेच तापले होते. पोलिसांनीही याप्रकरणातील संभाव्य कटकारस्थानाचा तपास करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात ही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अखेर दोन वर्षानंतर पुणे ग्रामीण पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळाले आहे.

Byte Sent on Mojo
Sandip Patil
Byte Sandip Patil

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.