ETV Bharat / state

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर ओला कॅब प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक - ओला कॅब

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना तळेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. एप्रिल महिन्यात २० ते २६ तारखेच्या दरम्यान तब्बल दहा ते बारा प्रवाशांना मोटारीतून नेऊन मारहाण करत लुटल्याची कबुली आरोपींनी दिली आहे

पुणे
author img

By

Published : May 4, 2019, 12:09 PM IST

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना तळेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. एप्रिल महिन्यात २० ते २६ तारखेच्या दरम्यान तब्बल दहा ते बारा प्रवाशांना मोटारीतून नेऊन मारहाण करत लुटल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी पप्पू शिवाजी कांबळे, सनी गौतम घाडगे यांना निगडी परिसरातून अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले.

पुणे

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तक्रारकर्ते प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहत थांबले होते. तेवढ्यात ओला कॅब चालकाने प्रत्येकी ३०० रुपयात अंधेरीपर्यंत सोडतो असे सांगून त्यांना गाडीत घेतले. यावेळी कारमध्ये पाठीमागील सीटवर दोघेजण अगोदरच बसले होते. भानुशाली यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम २० हजार रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लोढा प्रकल्पाच्या पुढे जाताच प्रताप आणि त्यांच्या भावाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून गाडीच्या खाली ढकलून देण्यात आले, आणि त्यांना तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. पीडित प्रताप यांनी तळेगाव पोलिसात फिर्याद दिली. त्याप्रमाणे तळेगाव पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींना जेरबंद केले.

अद्याप एक आरोपी फरार असून दोघांना अटक केली आहे. २० ते २६ एप्रिल दरम्यान पप्पू आणि सनीसह इतर एका आरोपीने डांगे चौक, वाकड पूल, देहूरोड, सिम्बॉसिस कॉलेज, किवळे या परिसरातून तब्बल दहा ते बारा प्रवाशांना पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली आहे.

Intro:mh pune 03 03 express way gang arrest av 7201348Body:mh pune 03 03 express way gang arrest av 7201348

anchor
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅब मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना लुटणाऱ्या टोळी तल्या 2 जणांना तळेगाव पोलिसांनी जेरबंद केलं आहे. एप्रिल महिन्यात २० ते २६ तारखेच्या दरम्यान तब्बल दहा ते बारा प्रवाश्यांना मोटारीतून नेउन मारहाण करत लुटल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी पप्पू शिवाजी कांबळे, सनी गौतम घाडगे यांना निगडी परिसरातून अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादी प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बस ची वाट पाहात थांबले होते. तेवढ्यात ओला कॅब चालकाने प्रत्येकी ३०० रुपयात अंधेरी पर्यंत सोडतो अस सांगून त्यांना गाडीत घेतले यावेळी कारमध्ये पाठीमागील सीटवर दोघे जण अगोदरच बसलेले होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम २० हजार रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लोढा स्कीमच्या पुढे जाताच फिर्यादी प्रताप आणि त्यांच्या भावाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून गाडीच्या खाली ढकलून देण्यात आलं, आणि त्यांना तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. पीडित प्रताप यांनी तळेगाव पोलिसात फिर्याद दिली. त्याप्रमाणे तळेगाव पोलिसांनी तपास सुरू
केला आणि आरोपींना जेरबंद केलं. अद्याप एक आरोपी फरार असून दोघे जण अटक आहेत. २० ते २६ एप्रिल रोजी पप्पू आणि सनीसह इतर एक आरोपीने डांगे चौक, वाकड ब्रिज, देहूरोड,सिम्बॉसिस कॉलेज, किवळे या परिसरातून तब्बल दहा ते बारा प्रवाश्यांना पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.