पुणे - औंध उरो जिल्हा रुग्णालयात आज दिवसभरात 12 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 131 वर पोहोचली आहे, तर आत्तापर्यंत 30 जण कोरोना मुक्त झाले असून 10 रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती डॉ. रोकडे यांनी दिली आहे.
औंध उरो जिल्हा रुग्णालयात पुणे ग्रामीण आणि शहरी भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. आज देखील पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील बाधित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. हे रुग्ण जुन्नर, गणेश पेठ पुणे, बोपोडी, कात्रज, जुनी सांगवी, पाषाण, शिरूर या परिसरातील आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार करण्यात येत आहे. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.