ETV Bharat / state

बंदी घातली तरी शिर्डीला जाणारच, तृप्ती देसाईंचा निर्णय - पुणे शहर बातमी

साईबाबा देवस्थान परिसरात पोशाख संबंधी फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी (दि. 10 डिसें.) सकाळी साडेआठ वाजता शिर्डीसाठी रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

तृप्ती देसाई
तृप्ती देसाई
author img

By

Published : Dec 9, 2020, 5:57 PM IST

Updated : Dec 9, 2020, 8:32 PM IST

पुणे - शिर्डी (जि. अहमदनगर) येथील साईबाबा देवस्थान परिसरात पोशाख संबंधी फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी (दि. 10 डिसें.) सकाळी साडेआठ वाजता शिर्डीसाठी रवाना होणार आहेत. बंदी असली तरी शिर्डीला जाणारच देसाईंचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सातारा रोडवर धनकवडी येथे असलेल्या निवासस्थानातून त्या गुरुवारी सकाळी शिर्डीला जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांना शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली आहे.

तृप्ती देसाई यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी

संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार दिल्याने शिर्डीत जाणारच

तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत बंदी करण्यात आली आहे. याबाबत आदेश शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले आहेत. शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाईंना त्यांच्या घरी जाऊन या आदेशाची नोटीस बजावली आहे. मात्र, ही नोटीस एकतर्फी असल्याचे तृप्ती देसाई यांचे म्हणणे आहे. शिर्डी संस्थानने लावलेला फलक अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधातील आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते, असे देसाईंचे म्हणणे आहे. संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही शिर्डीत जाणारच, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

नेमके काय आहे प्रकरण

शिर्डीच्या साई संस्थानने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या आवारात पोषाखा संदर्भात फलक लावले आहेत. भाविकांनी मंदिर परिसरात सभ्य पोशाख घालावा अशा स्वरुपाचे आवाहन संस्थानच्या वतीने फलक लावून करण्यात आले आहे. याच फलकांबाबत तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला असून भाविकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही पायमल्ली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संस्थानने हे फलक आठ दिवसात काढून टाकावे, असे आवाहन त्यांनी केले होते. मात्र, संस्थाननी हे फलक स्वतःहून न काढल्यास 10 डिसेंबरला शिर्डीत जाऊन स्वतः फलक हटवणार असल्याचे यापूर्वीच तृप्ती देसाई यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांना आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर दरम्यान शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव घालणारी नोटीस धाडण्यात आली आहे.

हेही वाचा - पोषाख प्रतिक्रिया : जाणून साईबाबा मंदिरातील भक्तांचे अभिप्राय

हेही वाचा - तृप्ती देसाईंना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत प्रवेशबंदी

Last Updated : Dec 9, 2020, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.