पुणे Training Aircraft Crashed : प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं विमान कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बारामतीमध्ये आज सकाळी सात वाजता घडली आहे. या घटनेत एक पायलट जखमी झाला आहे. बारामती इथं विमान प्रशिक्षण देणारी संस्था असून शिकाऊ पायलट हे विमान चालवितात. मात्र बारामती परिसरात शनिवारीही एक प्रशिक्षण देणारं विमान कोसळलं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
गोजुबावी इथं कोसळलं विमान : गोजुबावी गावाजवळ आज सकाळी रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेचं विमान प्रशिक्षणासाठी गेलं होतं. मात्र सकाळी सात वाजता हे विमान बारामती परिसरात असलेल्या गोजुबावी या गावाजवळ कोसळलं. या विमानात असलेला एक प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि त्याचा प्रशिक्षक जखमी झाल्याची माहिती बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे.
दोघांना केलं रुग्णालयात दाखल : शिकाऊ वैमानिक आणि च्याचा प्रशिक्षक या अपघातात जखमी झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांनीही जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे. या अपघाताचे कारण अद्यापही कळू शकले नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही या घटनेची कसून चौकशी करत असल्याचंही पोलीस निरीक्षक मोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
चार दिवसातील दुसरी घटना : बारामती औद्योगिक परिसरात रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अॅकॅडमी आहे. या संस्थेच्या एका शिकाऊ वैमानिकाचा चार दिवसापूर्वीच अपघात झाला होता. या अपघातात हा शिकाऊ वैमानिक जखमी झाला होता. त्यानंतर आज सकाळी ही दुसरी घटना घडल्यानं या परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या अपघाताची दखल डीजीसीआयनं देखील घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएनं दिले आहेत.
हेही वाचा :