पिंपरी चिंचवड Train Accident : पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. पुणे-मुंबई लोहमार्गावर चिंचवड ते आकुर्डी (Chinchwad to Akurdi Railway line) रेल्वे स्थानक दरम्यान रुळावर मोठमोठे दगड ठेवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रुळावरील दगड हटविले आणि मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस (Chinchwad Police) ठाण्यात शैलेंद्र अवधेश त्रिपाठी यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगड हटवल्याने मोठी हानी टळली : रेल्वे कर्मचारी ट्रॅकमॅन इर्शाद शेख, अनिरुद्ध शिंदे, तौफिक शेख, गणेश निंबाळे, शरद देशमुख हे रेल्वे रुळाची नियमीत पहाणी करत होते. यावेळी कोणीतरी जिवीताला हानी होण्याच्या उद्देशाने चिंचवड ते आकुर्डी दरम्यान रेल्वे रुळावर दगड ठेवले होते. वेळेत दगड हटवल्याने मोठी हानी टळली. याप्रकरणी आरोपीवर भारतीय रेल्वे अधिनीयम 1989 कलम 150 (1) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचवड पोलीस (Chinchwad Police) घटनेचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहे.
काय घडली नेमकी घटना : चिंचवड ते आकुर्डी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात समाजकंटकांनी रुळांवर मोठं मोठे दगड रचून ठेवून रेल्वे गाडीला अपघात करण्याचा डाव रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनाने सुदैवाने उधळला आहे. मोठे दगड अप लाईन ट्रॅकवर टाकण्यात आले होते. रेल्वे विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे रेल्वे कर्मचारी या विभागात रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंग कामासाठी गेले असताना, कर्मचाऱ्यांनी चिंचवड ते आकुर्डी दरम्यान UP लाईन ट्रॅकवर मोठे दगड ठेवले आढळून आले. त्यामुळे पुणे विभागातील रेल्वे प्रशासनाने काही समाजकंटकांनी रेल्वे रुळांवर लावलेले मोठे दगड वेळीच हटवल्याने मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा -