पुणे - सकाळच्या वेळी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाणारा मार्गावर झालेली वाहतूकीची एका आजीबाईने सोडवली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्राफिक पोलिसांपेक्षा जास्त चपळतेने वाहतूकीच्या कोंडी फोडणाऱ्या आजीबाई सद्या चर्चा विषय ठरल्या आहेत.
सकाळच्या वेळी नोकरदार आपल्या कामानिमित्ताने बाहेर पडतो. तेव्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली. हे पाहून एक आजीबाई तिथे आल्या आणि त्यांनी लागलेच 'चार्ज' घेत वाहतूक सुरूळीत करण्यासाठी काम सुरू केले.
आजीबाईंनी काही मिनिटातच वाहतूक व्यवस्था सुरुळीत केली. आजीबाईंचा उत्साह आणि चपळता पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. दरम्यान, अज्ञाताने आजीबाई वाहतूक सुरूळीत करताना त्याचे रेकार्डींग केले. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असता, हा व्हिडिओ सद्या चांगलाच व्हायरल झाला आहे.