पुणे - शहरात गेल्या 24 तासांमध्ये 4426 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2107 रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. आज दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील 7 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2 लाख 59 हजार 112 वर पोहोचला असून, यापैकी 2 लाख 20 हजार 770 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 33 हजार 123 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
पुणे विभागात 27 मार्चच्या आकडेवारीनुसार 6 लाख 50 हजार 743 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 32 हजार 337 झाली आहे. तर ऍक्टीव्ह रुग्ण संख्या 64 हजार 527 इतकी आहे. आतापर्यंत 17 हजार 67 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यू दराचे प्रमाण 2.33 टक्के आहे.
पुणे जिल्ह्यातील आकडेवारी
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी 5 लाख 6 हजार 347 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 41 हजार 784 जणांनी कोरोनावर माती केली असून, सध्या 54 हजार 855 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे एकूण 9 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील आकडेवारी
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवरी 64 हजार 108 वर पोहोचली आहे. त्यापैकी 59 हजार 357 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 884 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 867 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी 59 हजार 416 वर पोहचली आहे. त्यापैकी 53 हजार 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 4 हजार 476 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील आकडेवारी
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी 50 हजार 753 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 47 हजार 352 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सांगलीमध्ये 1 हजार 616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, 1 हजार 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी ही 51 हजार 713 वर पोहोचली असून, 49 हजार 235 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.