ETV Bharat / state

पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण... - to hit Police officer in police station at baramati

चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण... बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार...

पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण
author img

By

Published : Nov 9, 2019, 8:28 AM IST

पुणे - बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत शहरात घडला आहे. चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण झाल्याने बारामतीत एकच चर्चा सुरू आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांला मारहाण

हेही वाचा... ठाण्यात भररस्त्यावर टोळक्याच्या हल्ल्यात ४ जण जखमी

पती मारहाण करत असल्याची फिर्याद देण्यासाठी आलेल्या पत्नीला थेट पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी रोखले असता त्‍याने पोलीस कर्मचार्‍यांसह अधिकाऱ्यांला शिवीगाळ करत मारहाण केली.

हेही वाचा... जंगलपरिसरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला

शहरातील आमराई परिसरातील गोदावरी पाथरकर ही महिला तिचा पती लाला आत्माराम पाथरकर हा मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. तेव्हा फिर्यादीचा पती लाला पाथरकर याने पोलीस ठाण्यात जाऊनच फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असणारे पोलीस कर्मचारी गायकवाड व पोसई मुंडे यांनी फिर्यादीला मारहाण करण्यापासून रोखले असता त्यांना ही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत मुंडे यांच्या कानाला दुखापत झाली असून करंगळी फॅक्चर झाली आहे. याबाबत पोलीस हवालदार रामदास लक्ष्मण जाधव यांनी पोलीस ठाण्यात लाला पाथरकर विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Intro:Body:बारामती..

पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण..

बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे... चक्क पोलिस ठाण्यातच पोलिसांना मारहाण झाल्याने बारामतीत एकच चर्चा सुरू आहे....

पती मारहाण करत असल्याची फिर्याद देण्यासाठी आलेल्या पत्नीला थेट पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी रोखले असता त्‍याने पोलीस कर्मचार्‍यांसह अधिकाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली...

शहरातील आमराई परिसरातील गोदावरी पाथरकर ही महिला तिचा पती लाला आत्माराम पाथरकर हा मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती... तेव्हा फिर्यादीचा पती लाला पाथरकर याने पोलीस ठाण्यात जाऊनच फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.. तेथे उपस्थित असणारे पोलीस कर्मचारी गायकवाड व पोसई मुंडे यांनी फिर्यादी ला मारहाणी पासून रोखले.. असता त्यांना ही अर्वाच्च भाषेत  शिवीगाळ करत मारहाण केली या मारहाणीत मुंडे यांच्या कानाला दुखापत झाली असून करंगळी फॅक्चर झाली आहे.याबाबत पोलीस हवालदार रामदास लक्ष्मण जाधव. यांनी पोलीस ठाण्यात लाला पाथरकर विरुद्ध फिर्याद दाखल केली असून भा द वि कलम 353, 332, 333, 294, 504, 506, गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पो सई गंपले हे करत आहे...Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.