ETV Bharat / state

सराफा दुकानात 'हातसफाई' करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद - दुकान

पोलिसांनी तीनही महिलांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलांकडून पुणे शहर व जिल्ह्यात अशा प्रकारचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून गुन्ह्याचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहेत.

दागिण्यांची चोरी करणाऱ्या महिलांसोबत पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Mar 21, 2019, 6:09 PM IST

पुणे - लोणीकाळभोर येथील चेतन ज्वेलर्स या सराफा दुकानात डिसेंबर २०१८ मध्ये चोरी झाली होती. दुकान मालकाचे लक्ष विचलित करून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला आरोपींना पुणे ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८) रिना यशवंत पवार (वय २७) आणि पूनम काळू पडवळ (वय २९) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.

सराफा दुकानातून चोरी करताना अल्पवयीन मुलगा व आरोपी महिला

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी व नंदा चव्हाण हिचा १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असे मिळून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले आहे. ११ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी महिलांनी चेतन ज्वेलर्समधे संगनमताने दागिने खरेदीचा बहाणा केला. दुकानदाराची नजर चुकवून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

याप्रकरणी दुकान मालक गोपाळ शंकर वर्मा यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान दुकानातील सीसीटीव्ही तपासले आणि व्हायरल केले असता फुटेजमधील वर्णणाच्या महिला कात्रज पुणे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कात्रज येथे जावून तेथील परिसरात फूटेजमधील महिलांचे फोटो दाखवले असता या महिला त्याच असल्याची खात्री झाली.

Intro:पुण्यातील लोणीकाळभोर येथील चेतन ज्वेलर्स या सराफा दुकानात डिसेंम्बर २०१८ मध्ये दुकान मालकाचे लक्ष विचलित करून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला आरोपींना पुणे ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८) रिना यशवंत पवार (वय २७ वर्षे) आणि पूनम काळू पडवळ (वय २९ वर्षे) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
त्यांचेकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी व नंदा चव्हाण हिचा १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असे मिळून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले आहे. Body:११ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी महिलांनी लोणीकाळभोर येथील चेतन ज्वेलर्स या दुकानात संगनमताने मिळून दागिने खरेदीचा बहाणा करून दुकानदाराची नजर चुकवून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी दुकान मालक गोपाळ शंकर वर्मा यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.Conclusion:पोलिसांनी तपासादरम्यान दुकानातील सीसीटीव्ही तपासले आणि व्हायरल केले असता फुटेजमधील वर्णनाच्या महिला कात्रज पुणे परिसरात राहत असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर कात्रज येथे जावून तेथील परिसरात फूटेजमधील महिलांचे फोटो दाखवले असता या महिला त्याच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी या तीनही महिलांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले.

या महिलांकडून पुणे शहर व जिल्हयात अशा प्रकारचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून गुन्ह्याचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.