ETV Bharat / state

सीरमची 'कोविशिल्ड' लस मोठ्या बंदोबस्तात विमातळावर दाखल

आज पहाटे 4 वाजून 55 मिनिटाच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीने भरलेले 3 कंटेनर पुणे विमानतळावर पाठवण्यात आले. ते कंटेनर विमानतळावर दाखल झाले आहेत. देशभरातील विविध शहरात ही लस विमानाद्वारे पाठवण्यात येत आहे.

Three trucks carrying Covishield vaccine reach Pune International Airport from Serum Institute of India's facility in the city
सिरमची 'कोविशिल्ड' लस मोठ्या बंदोबस्तात विमातळावर दाखल
author img

By

Published : Jan 12, 2021, 7:30 AM IST

Updated : Jan 12, 2021, 7:41 AM IST

पुणे - कोरोनावरील सीरम इन्स्टिटयूटची 'कोविशील्ड' लस वितरणासाठी सज्ज झाली आहे. आज पहाटे 4 वाजून 55 मिनिटाच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीने भरलेले 3 कंटेनर पुणे विमानतळावर पाठवण्यात आले. ते कंटेनर विमानतळावर दाखल झाले आहेत. देशभरातील विविध शहरात ही लस विमानाद्वारे पाठवण्यात येत आहे.

अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी....
एकूण 6 कोल्ड स्टोरेज कंटेनर सिरममध्ये दाखल
सीरम इन्स्टिटयूटच्या ऑफ इंडियाला कोविशिल्ड लसीचे ऑडर मिळाल्यानंतर, या लसीचे वाहतूक करण्यासाठी काल (सोमवार) सीरम इन्स्टिटयूटमध्ये 6 कोल्ड स्टोरेज कंटेनर दाखल झाले होते. आज (मंगळवार) पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी सीरम इन्स्टिटयूटच्या गेटमधून लसीने भरलेले 3 कोल्ड कंटेनर विमानतळाकडे रवाना झाले होते. ते कंटेनर 5 वाजून 25 मिनिटांनी पुणे विमानतळावर पोहोचले आहेत. येथून देशभरातील विविध शहरांमध्ये विमानाद्वारे कोरोनावरील ही लस वितरणासाठी पाठवण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चेन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये ही लस पाठविण्यात आली आहे.
16 तारखेपासून सुरू होणार लसीकरण
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. यामध्ये सुरुवातीला तीन कोटी वैद्यकीय आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षापुढील लोकांना ही लस देण्यात येणार आहे. तसेच पन्नास वर्षांहून कमी असलेल्या मात्र गंभीर आजार झालेल्या रुग्णांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीचा एक डोस केवळ दोनशे रुपयांना उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
जवळपास 300 हून अधिक कोल्ड स्टोरेज कंटेनर सज्ज
देशभरात लस पोहोचवण्याचे मोठे आव्हान वितरकांवर असणार आहे. कारण सीरम इन्स्टिटयूटवरून विमानतळ आणि पुढे त्या त्या राज्यातील संबंधित विमानतळावरून कोल्ड स्टोरेज डेपोपर्यंत लस पोचवण्याची जबाबदारी या कंपन्यांना पार पाडावी लागणार आहे. यासाठी 300 कोल्ड स्टोरेज कंटेनर सज्ज करण्यात आले आहेत.
सरकार सीरमकडून एक कोटी 10 लाख डोस खरेदी करणार
कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी सरकारने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑडर दिली आहे. सरकार सीरमकडून कोविशिल्ड लसीचे एक कोटी 10 लाख डोस खरेदी करणार आहे. आज सकाळपासूनच या लसीचे डिलिव्हिरी पाठवण्यास सुरूवात झाली असून सुरूवातीला 3 कोल्ड स्टोरेज कंटेनरमधून ही लस विमानतळावर पाठवण्यात आली.

Last Updated : Jan 12, 2021, 7:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.