ETV Bharat / state

Three People Drowned In Pune : पुण्यात तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू - pune 3 younger drowned in lake

दौंड शहरातील तीन युवकांचा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मेरगळवाडी येथील तलावात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी ( Three people drowned in daund pune ) घडली. याबाबत माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

Three people drowned in daund pune
तरूणांचा तलावात बुडुन मृत्यू
author img

By

Published : Mar 7, 2022, 12:05 PM IST

Updated : Mar 7, 2022, 12:30 PM IST

दौंड (पुणे) - दौंड शहरातील तीन युवकांचा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मेरगळवाडी येथील तलावात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी ( Three people drowned in daund pune ) घडली. याबाबत माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. असरार अब्दुल अलीम काझी ( वय २१ ), करिम अब्दुल हादी काझी ( वय २० ), अतिक उझजमा फरिद शेख ( वय २०, सर्व रा. नवगिरे वस्ती, ता. दौंड ) अशी मयत युवकांची नावे आहेत.

Three People Drowned In Pune
अतिक उझजमा फरिद शेख

फोन उचलत नसल्याने आला संशय -

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि. ६) सायंकाळी ४ वाजता असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख हे तिघे घरातुन बाहेर फिरण्यासाठी निघुन गेले होते. रात्री आठ वाजले तरी ते घरी आले नाहित म्हणून घराच्यांनी असरार अब्दुल अलीम काझी व करीम अब्दुल हादी काझी यांच्या मोबाईल वरती फोन लावला. मात्र फोन बंद होता. मग त्यांच्या सोबत गेलेला मित्र अतिक उझजमा फरिद शेख याच्या मोबाईलवर फोन लावला असता फक्त रिंग वाजत होती मात्र तो उचलत नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख , रफिक इकबाल सय्यद, कलिम सलीम सय्यद या सर्व जणांनी त्यांचा दौंड शहरास परिसरात शोध सुरू केला.

Three People Drowned In Pune
करीम काझी

तलावाच्या काठाजवळ आढळले कपडे आणि बॅग -

शहरालागत असणाऱ्या मेरगळवाडी, लिंगाळी (ता. दौंड) येथील शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाजवळ जावून पाहिले असता तेथे या तिघांनी नेलेली हिरो होण्डा कंपनीची स्प्लेंण्डर गाडी मिळून आली. त्यानंतर तलावाच्या नजीक जावून शोध घेतला असता तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे व बॅग असे साहित्य मिळून आले. त्यानंतर शोध घेणाऱ्यांना लोकांना संशय आला की, तिघे मुले तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय येताच त्यांनी याबाबत दौंड पोलिस स्टेशनला माहिती दिली.

Three People Drowned In Pune
असरार काझी

पाण्यात बुडाल्याने तिघांचाही मृत्यू -

दौंड पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार भाकरे पांडुरंग थोरात, विशाल जावळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तलावातील पाण्यात जाऊन शोध घेतला असता या तिघेही आढळून आले. त्यांना दौंड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता अशी माहिती पोलीसांनी दिली.

हेही वाचा - Russia-Ukraine war LIVE Updates : पंतप्रधान मोदी आज झेलेन्स्की आणि पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करणार, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

Last Updated : Mar 7, 2022, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.