ETV Bharat / state

पुणे विभागात 365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आतापर्यंत 9 हजार 778 जण कोरोनामुक्त

author img

By

Published : Jun 15, 2020, 8:16 PM IST

विभागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 563 झाली आहे. यातील 9 हजार 778 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 5 हजार 83 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विभागातील 702 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

total corona cases in pune division
पुणे विभागात 365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

पुणे - विभागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 563 झाली आहे. यातील 9 हजार 778 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 5 हजार 83 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विभागातील 702 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, 255 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागातील एकूण रुग्णांपैकी पुणे जिल्ह्यातील 12 हजार 147 रुग्ण आहेत. यातील 7 हजार 619 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, सध्या 4 हजार 27 रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्के इतके आहे. सोमवारी पुणे विभागातील रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 365 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 270, सातारा जिल्ह्यात 12 , सोलापूर जिल्ह्यात 63, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 0 अशी रुग्ण संख्या आहे.

सातारा जिल्हयात 738 कोरोनाबाधित रुग्ण असून 508 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 196 आहे. एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 1 हजार 722 कोरोनाबाधित रुग्ण असून 911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 659 आहे. एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 236 कोरोनाबाधित रुग्ण असून 117 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण 112 आहेत. एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 720 कोरोनाबाधित रुग्ण असून 623 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 89 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 18 हजार 411 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 15 हजार 842 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 569 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 15 हजार 563 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.