ETV Bharat / state

कोरोनामुक्त तरुणांना डिस्चार्ज; 'असा' दिला डॉक्टरांनी निरोप

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे पिंपरीचिंचवडमधील नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र यशस्वी उपचार होत असल्याने कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. आज पिंपरीचिंचवडमधील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

Pimpari chinchwad
कोरोनामुक्त तरुणांना डिस्चार्ज; 'असा' दिला डॉक्टरांनी निरोप
author img

By

Published : Mar 27, 2020, 3:27 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील तीन कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला. ते गेल्या १४ दिवसांपासून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु, त्यांना दोन आठवडे होम क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याचे डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले आहे. ते त्यांच्यावर उपचार करत होते. आज टाळ्यांच्या कडकडाटात तिन्ही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकामधून घरी सोडण्यात आले.

कोरोनामुक्त तरुणांना डिस्चार्ज; 'असा' दिला डॉक्टरांनी निरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये १२ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी आज तीन जणांना घरी सोडण्यात आले आहे. दुबईहुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, डॉ. विनायक पाटील आणि त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न करत १४ दिवस उपचार केले. त्यानंतर दोन टेस्ट करण्यात आल्या, त्यामध्ये ते निगेटिव्ह आले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यापूर्वी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी टाळ्या वाजवून डॉ. विनायक पाटील आणि स्टाफचा उत्साह वाढवला. तर तिन्ही कोरोनामुक्त झालेल्या तरुणांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.