ETV Bharat / state

पुणे, कॉसमॉस बँक 'सायबर' लूट प्रकरणातील आरोपींना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - कार्ड क्लोनींग

पुण्यातील कॉसमॉस बँकेचा डेटा चोरून 94 कोटी 42 लाखांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले आहे. एटीएमकार्ड क्लोन करून पैसे काढणाऱ्या टोळीत या तिघांचा सहभाग असल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सायबर
author img

By

Published : Sep 1, 2019, 3:32 AM IST

Updated : Sep 1, 2019, 6:09 AM IST

ठाणे - पुण्यातील कॉसमॉस बँकेचा डेटा चोरून 94 कोटी 42 लाखांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले आहे. एटीएमकार्ड क्लोन करून पैसे काढणाऱ्या टोळीत या तिघांचा सहभाग असल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या त्रिकुटाने दुबई, दक्षिण आफ्रिका, युके व अमेरिका या देशांतील बँकेचा डाटा चोरून कार्ड क्लोनींगद्वारे दुबई व भारतातील एटीएममधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली. या त्रिकुटाला ठाणे न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून यातील 1 आरोपी परदेशात लपला असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

कॉसमॉस बँक 'सायबर' लूट प्रकरणातील आरोपींना अटक

मुंब्य्रात 1 व्यक्ती 2 वेगवेगळ्या नावाचे आधार व पॅन कार्ड बाळगतो तसेच वारेमाप पैसे उधळतो अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी शाबाज मोहम्मद आरिफ खत्री याच्यासह केशवराव मगता पात्र उर्फ रेड्डी याला 20 ऑगस्ट 2019 रोजी अटक केली.

त्यांच्या चौकशीत कॉसमॉस बँकेतील काही आरोपी उत्तरप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने असिफ शेख व फिरोज शेख या दोघांना अटक करण्यात आली. ह्या दोघांसह शाबाज खत्री याचा पुण्यातील कॉसमॉस बँकेचा डेटा चोरून फसवणूकीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले असून त्याच्यावर मुंबईत पार्कसाईट आणि बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

Intro:कार्ड क्लोनिंग टोळीकडून पुण्यातील कॉसमॉस बँकेला कोट्यवधीचा गंडा  
परदेशातील बँकांही लक्षBody:   
 पुण्यातील कॉसमॉस बॅंकेचा डाटा चोरून 94 कोटी 42 लाखांची फसवणूक करणा:या त्रिकुटाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्या सहभाग एटीएमकार्ड क्लोन करून पैसे काढणा:या टोळीच्या चौकशीत पुढे आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.या त्रिकुटाने दुबई,दक्षिण आफ्रिका,यु.के व अमेरिका या देशांतील बँकेचा डाटा चोरून कार्ड क्लोनींगद्वारे दुबई व भारतातील एटीएममधून मोठय़ा प्रमाणात रक्कम काढली.या त्रिकुटाला ठाणे न्यायालयाने 7 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली असून यातील एक आरोपी परदेशात लपला असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.
  मुंब्य्रात एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या नावाचे आधार व पॅन कार्ड बाळगतो व तो वारेमाप पैसे उधळतो अशी माहिती ठाणो गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांना मिळताच त्यांनी शाबाज मोहम्मद आरिफ खत्री याच्यासह केशवराव मगता पात्र उर्फ रेड्डी याला 20 ऑगस्ट 2019 रोजी अटक केली. त्यांच्या चौकशीत कॉसमॉस बँकेतील काही आरोपी उत्तरप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने असिफ शेख व फिरोज शेख या दोघांना अटक केली. ह्या दोघांसह शाबाज खत्री यांचा पुण्यातील कॉसमॉस बँकेचा डाटा चोरून फसवणूकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आहे.शाबाज याच्यावर मुंबईत पार्कसाईट आणि बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.   
Byte - विवेक फणसळकर ( पोलीस आयुक्त,ठाणे )Conclusion:
Last Updated : Sep 1, 2019, 6:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.