पुणे - राज्यासह संपूर्ण देशात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. पाच दिवस साजऱ्या होणार्या या उत्सवात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपाल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र, बारामतीत पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे पाहायला मिळते. पाडव्या दिवशी शरद पवार संपूर्ण कुटुंबासह बारामतीच्या गोविंद बाग निवासस्थानी उपस्थित असतात. त्यामुळे राज्याभरातून अनेक कार्यकर्ते, सगेसोयरे, नातेवाईक दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागमध्ये दाखल होतात.
शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मांदियाळी - बारामतीत दिवाळी पाडवा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिवाळीच्या पाडव्या दिवशी तिथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करतात. यावेळी भेटीसाठी आलेली प्रत्येक व्यक्ती पवारांसोबत हस्तांदोलन करण्याबरोबरच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सुवर्ण संधी सोडत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून हजारो लोक गोविंदबागेत येत असतात.
पुणे - राज्यासह संपूर्ण देशात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. पाच दिवस साजऱ्या होणार्या या उत्सवात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपाल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र, बारामतीत पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे पाहायला मिळते. पाडव्या दिवशी शरद पवार संपूर्ण कुटुंबासह बारामतीच्या गोविंद बाग निवासस्थानी उपस्थित असतात. त्यामुळे राज्याभरातून अनेक कार्यकर्ते, सगेसोयरे, नातेवाईक दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागमध्ये दाखल होतात.
साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते.....
देशात साजरे होणाऱ्या अनेक सणा पैकी दिवाळी हा सण मोठा मानला जातो... पाच दिवस साजरे होणार्या उत्सवातील पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो...
हा दिवस पवार कुटुंबीय सगेसोयरे, मित्रपरिवार, कार्यकर्ते यांच्यासाठी देतात. पवार कुटुंबियांना विशेषता पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज व्यक्ती मित्र, तरुण व वृद्ध येत असतात.
..देशाच्या सर्वेच्च नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याबरोबरच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सुवर्ण संधी च यानिमित्ताने उपलब्ध असते म्हणूनच मागील अनेक वर्षापासून पवार साहेबांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून हजारो लोक गोविंद बागेत येत असतात. त्या प्रत्येकाला पवार साहेबांना भेटण्यासाठी हा खास दिवस असतो.या दिवशी सर्वसामान्यांसह सगे सोयरे, वेगवेगळ्या पक्षातील नेते,कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात. राज्यातून आलेल्या नागरिकांना सकाळी सहा वाजल्यापासूनच पवार साहेब व कुटुंबिय भेटतात. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी रांगेत उभे असणा-या नागरिकांसाठी यावेळी ठिकठिकाणी चहा व नाष्टा सोय असते. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच या एका दिवसात हजारो कार्यकर्ते व लहान थोरांसह अबालवृध्द गोविंद बागेत येतात.व पवार साहेबांना भेट देऊन जातात. Conclusion: