ETV Bharat / state

'जनतेचे नाव पुढे करून बिल्डरांचा फायदा करायला निघाले आहे ठाकरे सरकार' - baramati latest news

जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायद करायला हे सरकार निघाले आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

this-government is going to -benefit-the-builders-by-putting-name-of people said devendra fadnavis in baramati
'जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायद करायला ठाकरे सरकार निघाले आहे'
author img

By

Published : Dec 24, 2020, 8:10 PM IST

बारामती - बिल्डरांचा प्रीमियम कमी करण्यासंदर्भात काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली वादावादी ही जनहितासाठी होती, की स्वतःहिता होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. यासंदर्भातही अनेक चर्चा समोर येत आहेत. याचा फायदा ग्राहकांना झाला पाहिजे. मात्र, जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायद करायला हे सरकार निघाले आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

लक्ष्मी-नृसिंह मंदिराला भेट -

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नरसिंह मंदिराला आज सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री लक्ष्मी-नृसिंहाची पुजा करून दर्शन घेतले. मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्यावतीने सत्कार केला. तसेच श्री लक्ष्मी नृसिंंह देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अभय वांकर यांनीही त्यांचा सत्कार केला.

विकासकामांची घेतली माहिती -

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरात चालू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. दशरथ राऊत यांनी प्रथेप्रमाणे देवेंद्र फडणीस यांना चहा दिला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद आदीसह इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - 'विधानपरिषदेच्या मोहापोटी राजू शेट्टी यांच्याकडून अडत्यांसह व्यापाऱ्यांची दलाली'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.