पुणे - दौंड कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील ईटरनीस फाईन या कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे केमिकल चोरीस गेले होते. हे केमिकल चोरणाऱ्या टोळीस दौंड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
हेही वाचा - VIDEO : गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठीच्या तयारीला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुंभ (ता. दौंड ) येथील औद्योगिक वसाहतीतील ईटरनीस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीमधील ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रुपये किंमतीचे रोडिअम ऑन अॅल्युमिना नावाचे केमिकल चोरीला गेले होते. याबाबत कंपनीचे सुरक्षा रक्षक विष्णू बाजीराव डुबे यांनी दिनांक १६ मार्च २०२२ रोजी दौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
कोट्यावधी रुपयाचे केमिकल चोरीला गेल्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबतच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना दिल्या होत्या. या गुन्ह्याच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक यांनी वेगवेगळे तीन तपास पथके तयार करून तपासाची सुत्रे फिरवत आतापर्यंत एकून ९ आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेले आरोपी : यामध्ये राहुल बाळासाहेब काळे (वय 39, अहमदनगर), अंकीत वसंतराव जाधव (वय 24, रा. रोटी ), श्याम प्रदिप इंगोले (वय 21 मुरखेड), महेश तात्यासाहेब गायकवाड (वय 34, रा. कुरकुंभ), गोकुळ महादेव धुमाळ (वय 39, रा. मुर्टी. बारामती), मल्लिकाअर्जुन विठ्ठल खेडगी (वय 31 रा. काशिमिरा ठाणे), डब्बू ऊर्फ भगेलू कहार (वय, 31 रा. उत्तर प्रदेश), उदयराज श्रीराम यादव (वय 60, मुंबई), विष्णू मच्छिंद्र विटकर (रा. मोरे वस्ती दौंड) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कामगिरी राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, पो. हवालदार शंकर वाघमारे, पांडुरंग थोरात, सुभाष राऊत, आदींनी केली.