ETV Bharat / state

Pune Crime News: बँकेत स्लिप भरणाऱ्या ग्राहकाच्या हातातून २ लाख लंपास, चोरीच्या अजब प्रकाराने पोलिसही चक्रावले! - पुणे पोलीस गुन्हे वृत्त

चोराने बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून भरदिवसा बँकेत ग्राहकाला 2 लाखांना गंडा घातला आहे. या प्रकाराने पुण्यातील गुन्हेगारीचा अजब प्रकार समोर आला आहे.

thief pretending to be a bank employee
ग्राहकाच्या हातातून २ लाख लंपास
author img

By

Published : Jun 8, 2023, 11:15 AM IST

पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. शहरात विविध गुन्हे घडत आहेत. पुण्यात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा येथील गर्दीच्या चौकात असलेल्या बँकेतून दिवसाढवळ्या 2 लाख रुपये घेऊन चोर पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अक्षय गोटे वय 38 वर्षे, धंदा रियल इस्टेट, रा. सी 308 अलकसा सोसायटी महमदवाडी यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्कार दिली आहे. कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय गोटे हे रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. जागेच्या व्यवहारातून अक्षय यांना 2 लाख रोख रुपयाचे कमिशन मिळाले. ते बुधवारी सकाळी पाऊणे अकरा वाजल्याच्या सुमारास इन्डसन्ड बँक, ज्योती हॉटेल चौक, कोंढवा पुणे येथे पोहोचले. रक्कम 2 लाख रुपये पत्नी कविता गोटे यांचे अकाऊंट भरण्यासाठी ते बँकेतील स्लि असता बँकेमधील पैसे भरण्याची स्लिप घेवून त्यावर माहिती भरत असताना फिर्यादी याच्या जवळ एक अनोळखी व्यक्ती आला.

बँक कर्मचारी असल्याचे भासविलेआरोपीने फिर्यादीला बँकेतील कर्मचारी असल्याचे सांगितले. आम्हाला एटीएममध्ये पैसे भरायचे आहेत. तुमची स्लिप लवकर भरा असे सांगितले. तो माणुस काऊंटर येथे जावुन तेथील मॅडम यांच्याशी बोलू लागला. त्यानंतर तक्रारदार पैसे भरण्याची स्लिप भरत असताना पुन्हा तो माणूस आला. त्याने मला पैसे द्या, असे सांगितले. तेव्हा हा चोर बँकेतील कर्मचारी असल्याचे तक्रारदाराला वाटले. तक्रारदाराने चोराला पैसे दिले आणि तो स्लीप भरू लागला.

पोलिसांचा तपास सुरू: फिर्यादी याने स्लीप भरल्यावर जेव्हा तो कॅश काऊंटरवर गेला तेव्हा त्याला तो माणूस दिसला नाही. चोर ती रक्कम घेऊन तो लंपास झाला. याबाबत फिर्यादी याने बँकेत चौकशी केल्यावर हा व्यक्ती बँकेतील कर्मचारी नसल्याचे समोर आले. यावेळी फिर्यादी याने तात्काळ पोलीस स्टेशन येथे भेट देत तक्रार दाखल केली आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

  1. Mumbai Crime News: प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा खून करून पुरला मृतदेह, पोलिसांनी शिताफीने आरोपीला केली अटक
  2. Mumbai Crime News: 56 वर्षीय व्यक्तीकडून 32 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची तुकडे करून हत्या; मुंबईत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती
  3. Beed Crime News: जावयाला दुसरे लग्न करू न दिल्याने सासऱ्याचा खून? मुलाच्या विवाहाच्या तोंडावर केली हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.