ETV Bharat / state

स्थलांतरितांच्या वाटेला निर्वासितांचे जगणे...मराठवाड्यातील कुटुंबे भोगतायत पुण्यात उपेक्षा

पोटासाठी स्थलांतरित झालेल्या माणसांना ना काम मिळतेय ना रोजगार..मिळतेय ती फक्त उपेक्षा

स्थलांतरितांच्या व्यथा
author img

By

Published : Feb 12, 2019, 7:50 AM IST

पुणे - दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातून अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. कामाच्या शोधात पुणे जिल्ह्यात ही माणसे दाखल तर होत आहेत, पण त्यांच्या हाताला काम आणि रहायला जागा मिळत नाही. यामुळे या कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगारासाठी स्थलांतरीत झालेली ही कुटुंबे निर्वासिताचे जगणे जगत आहेत.

स्थलांतरितांच्या व्यथा
undefined

मराठवाड्यामधील जालना जिल्ह्यातून आलेली ही आठ - दहा कुटुंबे आंबेगाव तालुक्यामध्ये डोंगराच्या कपारीला वस्ती करून राहू लागली होती. पण, या ठिकाणीही या नागरिकांना राहू दिले गेले नाही. रोजगारही मिळत नसल्याने या कुटुंबांपुढे निवारा आणि अन्नाचा मूलभूत प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे त्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.

निवडणुका तोंडावर आल्यावर मतदानाची भीक मागत राजकीय मंडळी या गोरगरीब कुटुंबीयांकडे जाऊन आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र, प्रत्यक्षात या नागरिकांच्या पदरात काहीच पडत नाही. सरकारच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यांना आर्थिक मदत जाहीर झाली आहे. मात्र, नागरिकांपर्यंत ती पोहोचत नाही का असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. कष्टाची तयारी असतानाही हाताला काम मिळत नाही. त्यामुळे ही कुटुंबे मोठ्या विवंचनेत सापडली आहेत. अशा परिस्थितीत सरकार तरी आपल्या मदतीला येईल, अशी आशा बाळगून ही माणसे बसली आहेत.

Intro:anc-- दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातून अनेक कुटुंब स्थलांतरित झाली असून कामाच्या शोधात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दाखल होत असताना या कुटुंबांना कामही मिळेना व रहायला निवाराही मिळेना अशी परिस्थिती असताना "जगावं तरी कसं" असा प्रश्न या नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा आहे

मराठवाड्यामधील जालना जिल्ह्यातून आलेली ही आठ-दहा कुटुंब आंबेगाव तालुक्यामध्ये डोंगराच्या कपारीला वस्ती करून राहत असताना या ठिकाणीही या नागरिकांना राहवून दिले जात नाही त्यातून कामही मिळेना अशी परिस्थिती असताना चिमुकल्या मुलांसह दुष्काळी परिस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांचे आतोनात हाल होताना दिसत आहेत आणि हे नागरिक आपल्या भावना व्यक्त हि करत आहेत

CHOPAL --ROHIDAS GADGE --REPORTER

चांगलं शिक्षण घेतलं तरीही नोकरी मिळत नाही त्यातून भरपूर शेती असूनही प्यायला पाणी नाही अशा संकटात सापडलेले मराठवाड्यातील कुटुंबीय पोटाच खळग भरण्यासाठी पुण्यनगरीत आले खरे मात्र याच पुण्यनगरीत या नागरिकांची अशी आहेलना होत आहे त्यामुळे चिमुकल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबाची फरफट होत आहे तर दोन वेळेला जेवणही मिळत नाही "कसं जगायचं" हे तुम्ही सांगा अशी हाक हे नागरिक देत आहेत

निवडणुका तोंडावर आल्या तर मतदानाची भीक मागत राजकीय मंडळी या गोरगरीब कुटुंबीयांकडे जाऊन आश्वासनांचा पाऊस पाडतात मात्र प्रत्यक्षात या नागरिकांच्या पदरात काही पडत नाही यालाच माणुसकी म्हणतात का हा प्रश्न प्रत्येक राजकीय मंडळींनी स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे

सरकारच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यांना आर्थिक मदत जाहीर झाली आहे मात्र या नागरिकांपर्यंत ती पोहोचत नाही का असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहतो कष्ट करण्याची तयारी आहे मात्र हाताला काम मिळत नाही त्यामुळे पोटाला भाकरी कोण देणार अशी हाक देणाऱ्या या कुटुंबीयांची सरकारला दया कधी येणार का हेच पुढील काळात पाहावे लागेल.

Body:... स्पेशल स्टोरी....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.