ETV Bharat / state

'पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पैसे खासगी बँकेत ठेवायचे काही कारण नव्हते' - pune municipal corporation

पालिकेने खासगी बँकेत जमा केलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे. बँक अडचणीत आली तर पैसे कोण भरून देणार? महानगरपालिकेत कोणाचाही कोणावर वचक राहिलेला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

ajit pawar on private bank
अजित पावर
author img

By

Published : Mar 7, 2020, 5:10 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे येस बँकेत तब्बल ९८४ कोटी रुपये आहेत. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लागू केल्याने पालिका आर्थिक संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून खासगी बँकेत पैसे ठेवायचे काही कारण नव्हते. तो जनतेचा पैसा आहे. बँक अडचणीत आली तर पैसे कोण भरून देणार? असा सवाल करत पुढे काही अनुचित घडले तर महानगरपालिका चालविणारे याला जबाबदार असेल असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंंत्री अजित पवार

येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केले आणि देशात खळबळ उडाली. मध्यरात्री पासूनच एटीएमवर रांगा लागल्या. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेनेही ९८४ कोटी ठेवी स्वरूपात येस बँकेत जमा केले आहे. हा पैसा आता येस बँकेत अडकून पडला आहे. मात्र, आरबीआयने येस बँकेवर लावलेल्या निर्बंधाचा महानगरपालिकेच्या ठेवींवर कुठलाही परिणाम पडणार नसल्याचे सांगितले आहे. असे असले तरी, बँक अडचणीत आल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

पालिकेने येस बँकेत जमा केलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे. बँक अडचणीत आली तर पैसे कोण भरून देणार? महानगर पालिकेत कोणाचाही कोणावर वचक राहिलेला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, कोणी चुकीचे वागत असेल तर पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यात असलेल्या संस्था व्यवस्थित चालत आहेत की, नाही हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे, असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणासह त्याच्या आईवरही गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.