पुणे - शहरातील कोरोना स्थितीबाबत न्यायलायात नेमकी कुठली आकडेवारी सादर करण्यात आली आहे? हे पाहावे लागेल, जी आकडेवारी देण्यात आली ती जुनी आहे, सध्याची आकडेवारी असूच शकत नाही. असे सांगत पुणे शहरात कडक लॉकडाऊनची गरज नसल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. राज्य सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीमध्ये आणि प्रत्यक्षात असलेल्या आकडेवारीत विसंगती असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून आले आहे. मुंबईची आणि पुण्याची आकडेवारी बघता, त्यात केवळ पुणे शहराची नसून जिल्ह्याची आकडेवारी असेल असे महापौर म्हणाले.
पुण्याची प्रतिमा खराब होते
दरम्यान याबाबत कोर्टात आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत असे महापौर यांनी स्पष्ट केले. शहरातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी महापालिकेने दोन प्लांट सुरू केले आहेत. असे प्रयत्न महापालिका करत आहे. गेल्या अडीच महिन्यात शहरात नव्याने 8 हजार ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात आली, तसेच आता पीएमआरडब्ल्यू (PMRD) आणि एमएमआरडब्ल्यू (MMRD) याचीही तुलना करायला पाहिजे. न्यायालयात चुकीच्या पद्धतीची माहिती दिली असावी, आणि त्यामुळे पुण्याची प्रतिमा खराब होते आहे, असे महापौर म्हणाले. दरम्यान सध्या तरी यापेक्षा कडक लॉकडाऊनची शहरात आवश्यकता नाही अशी भाजपची भूमिका आहे.
हेही वाचा - धक्कादायक! श्रीरामपुरात नदीकाठी आढळल्या वापरलेल्या कोरोना टेस्ट किट!