ETV Bharat / state

Stealing Temple Jewelery Accused : मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती-पत्नीसह मेहुणीला अटक; राज्यातील २५ गुन्ह्यांचा लागला छडा - मंदिर दागिने चोरी आरोपी अटक

पुण्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांमधील २४ मंदिरातील देव देवतांचे दागिने व इतर साहित्य चोरणाऱ्या पत्नीसह मेहुणीला अटक करण्यात आली आहे. ( Stealing Temple Jewelery Accused ) ही कारवाई बारामती तालुका पोलिसांनी ( Baramati Taluka Police ) केली.

Theives arrested for stealing temple jewelery by baramati police
जप्त करण्यात आलेला सामान
author img

By

Published : Jan 10, 2022, 7:38 PM IST

बारामती (पुणे) - पुण्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांमधील २४ मंदिरातील देव देवतांचे दागिने व इतर साहित्य चोरणाऱ्या पत्नीसह मेहुणीला अटक करण्यात आली आहे. ( Stealing Temple Jewelery Accused ) ही कारवाई बारामती तालुका पोलिसांनी ( Baramati Taluka Police ) केली. त्यांच्याकडून सुमारे एका चारचाकी वाहनासह १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींची नावे -

शाहरूख राजु पठाण (वय २४, रा.गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव शिव तकारवाडी,निरा ता.पुरंदर जि.पुणे), पुजा जयदेव मदनाळ (वय १९, रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव जुनाबिडी कुंभारी, जि. सोलापूर) अनिता गोविंद गजाकोश (वय १९, रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ,जि. कोल्हापूर, मुळगाव- गोलघुमट शिवाजी चौक, जि. विजापुर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे घटना?

बारामती तालुक्यातील शिरसुफळ येथील शिरसाई मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने व मंदिरातील इतर साहित्य ८ जानेवारी रोजी चोरीस गेल्याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तालुका पोलिसांनी वेगवेगळी पथके बनवून शिरसुफळ, मळद, कुरकुंभ, दौंड, बारामती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा नंबर तपासण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून (एम.एच १४ एफ.एक्स ४५७६ ) हा वाहनाचा नंबर मिळविला.

हेही वाचा - Bully Bai App Case : बुली बाई ॲप प्रकरणातील दोघांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

या वाहन मालकाशी संपर्क केला असता वाहन चोरीस गेल्याचे समजले. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकरीचे झाले. मात्र, तपास पथकाने तांत्रिक बाबींवरून सदर गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका करवीर येथे असल्याची माहिती मिळाली. तद्नुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. अटक आरोपींमधील शाहरुख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी, समर्थ, फरासखाना, पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.