ETV Bharat / state

शिरुरमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी, 3 लाख 4 हजारांचा ऐवज लंपास - शिरूर चोरी न्यूज

शिरुरमध्ये चक्क पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी झाली आहे. यात एकूण 3 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे.

pune
पुणे
author img

By

Published : May 3, 2021, 10:44 PM IST

पुणे - शिरूर रामलिंग रस्त्यावरील बालाजी एम्पायर येथील तीन बंद बंगल्यांमध्ये चोरी झाली. दरवाजे तोडून व खिडकी गॅस कटरने कापून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. यात चोरट्यांनी एका घरातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू असा एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर इतर दोन बंगल्यांचे मालक गावाला असल्याने त्याबद्दल माहिती मिळू शकली नसल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले. चिंतेची बाब म्हणजे चोरी झालेल्या तीन घरांमध्ये मुंबई पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्याही बंगल्याचा समावेश आहे.

शिरुरमध्ये पोलिसाच्याच घरी चोरी, 3 लाख 4 हजारांचा ऐवज लंपास

याबाबत घरकाम करणाऱ्या मनिषा अमर जगदाळे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '1 मे रोजी सकाळी साडेदहा ते 2 मे रोजीच्या सकाळी 6 वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने आमच्या बंद बंगल्याचा अंडरलॉक दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. यानंतर एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच, आमच्या शेजारी राहणारे 20 बी बंगलो प्लॅटमधील राहणारे विनय देशपांडे यांच्या बाजूकडील खिडकी गॅस कटरने उचकटली. त्या पलीकडे राहणारे 21 ए मधील प्रमोद डोंगरे यांच्या बंद घराचाही दरवाजा उचकटून त्यांच्याही घरी चोरी केली. त्यांचा किती ऐवज चोरी गेला आहे याबाबत अद्याप ते घरी नसल्याने माहिती मिळू शकली नाही. तर चोरट्यांनी या तिन्ही घरातील कपाटे व इतर साहित्य उचकटून अस्तव्यस्त फेकले', अशी फिर्याद मनिषा जगदाळे यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पुणे ग्रामीणच्या श्वान पथकाला पाचारण केले. श्वाण पथकाचे प्रक्षिक्षक पोलीस कॉन्स्टेबल गणेश फापाळे व रवी बनसोडे यांच्या पथकाने श्वान सिंबाच्या माध्यमातून चोरांचा मागमूस काढण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता चरापले करीत आहेत.

हेही वाचा - राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हेही वाचा - आदर पुनावाला यांना जीवे मारण्याची धमकी, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.