ETV Bharat / state

राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहांना परवानगी, मात्र पुण्यात थिएटर बंदच - cineplex in pune news

५ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत. मात्र नवे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्‍न थिएटरचालकांसमोर उभा राहिला आहे. याशिवाय एक पडदा चित्रपटगृहचालकांनी तर थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपटगृहे सुरू केली, तर अधिक खर्च होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

pune theatre close news
पुणे चित्रपटगृहचालक न्यूज
author img

By

Published : Nov 5, 2020, 4:03 PM IST

पुणे - राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी नवे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्‍न थिएटरचालकांसमोर उभा राहिला आहे. याशिवाय एक पडदा चित्रपटगृहचालकांनी तर थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपटगृहे सुरू केली, तर अधिक खर्च होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाची भीती लोकांच्या मनात असल्याने थिएटर सुरू केले, तरी प्रेक्षक येतील का, ही देखील भीती चित्रपटगृह चालकांना सतावते आहे. त्यात ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी दिल्याने आर्थिक गणित जुळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूना एक्‍स्झिबिटर्स असोसिएशन-पुणे चित्रपट मालक संघ यांनी चित्रपटगृह सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील एकपडदा चित्रपटगृह यापुढील काळात बंद राहतील. मल्टिप्लेक्‍स चालकांना नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.

लस येईपर्यंत चित्रपटगृहे बंदच

आता चित्रपटगृह सुरू केल्यास नेहमीच्या खर्चापेक्षा दुप्पट खर्च होईल. तेवढे आर्थिक उत्पन्न मात्र मिळणार नाही. कारण कोरोनामुळे किती लोक सिनेमा पाहण्यासाठी येतील, हा प्रश्‍न आहे. या काळात कुटुंबीय एकत्रित सिनेमाला येऊ शकणार नाही. त्यामुळे प्रेक्षक कमी असतील, तर आर्थिक गणित कोलमडून जाईल. म्हणून कोरानाची लस येईपर्यंत एकपडदा चित्रपटगृहे आम्ही सुरू करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे...
मल्टिप्लेक्‍सलाही अडचण
मल्टिप्लेक्सवाल्यांसमोर देखील अडचणी आहेत, एक-दोन स्क्रीन सुरू करता येतील, प्रेक्षकही निम्मे असतील. त्यामुळे नवे चित्रपट प्रदर्शित होण्यावर सिनेमागृह सुरू करायचे की नाही, हे अवलंबून आहे. येत्या पंधरा दिवसांत त्याबाबत काय होते, हे पाहून निर्णय घेऊ असे सिटी प्राईडचे अरविद चाफळकर यांनी सांगितले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सिनेमागृह बंद आहेत. अनलॉकमध्ये चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली असली तरीही सिनेमागृहांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता ५ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत. यासाठी ५० टक्के क्षमतेसह सरकारने परवानगी दिली आहे. तसेच केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्सना परवानगी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.