ETV Bharat / state

ठरलं..! पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय 20 ऑक्टोबरपासून नियमित होणार सुरू - सावित्रीबाई फुले पुणे

राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. राज्यात याआधी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा असताना त्याआधीच शाळा सुरू झाल्या आहेत. आता पुण्यात येत्या 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू होणार आहेत. तसे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढला आहे.

विद्यापीठ
विद्यापीठ
author img

By

Published : Oct 18, 2021, 10:18 PM IST

Updated : Oct 18, 2021, 10:29 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. राज्यात याआधी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा असताना त्याआधीच शाळा सुरू झाल्या आहेत. आता पुण्यात येत्या 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू होणार आहेत. तसे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढला आहे.

चालू सत्राचा अभ्यासक्रम विहित कालावधीमध्ये शिकवून पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापक - प्राचार्यांची

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठेशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत सूचना पुणे विद्यापीठाने दिल्या आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोरोना उपाययोजना नियम 2020 अमलात आलेले आहेत. विद्यापीठाच्या या परिपत्रकाद्वारे सूचनेनुसार शासनाने तसेच पुणे व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे. तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालय परिसंस्था यांनी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांनी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. चालू सत्राचा अभ्यासक्रम विहित कालावधीमध्ये शिकवून पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापक व प्राचार्य यांची राहणार आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

चार ऑक्टोबर पासून शाळा झाल्यात सुरू

राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग दि. 4 ऑक्टोबर, 2021 पासून सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे 18 वर्षांवरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हेही वाचा - पुणे : महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येचे कारण आले समोर....; ब्रिगेडियरविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : Oct 18, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.