बारामती (पुणे) - शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही दिल्ली येथे वेगवेगळ्या पक्षातील खासदार शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र यावेळी सीमेवरच आम्हाला रोखण्यात आले. मी अनेकदा देशाच्या विविध सीमांवर अगदी वाघा बॉर्डरलाही अनेकदा गेले. मात्र या ठिकाणी कधीही आताच्या सारखी परिस्थिती पाहायला मिळाली नाही. आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा हातात काठ्या घेऊन पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता. जणू काय आम्ही त्या ठिकाणी गडबड गोंधळ करण्यासाठी आलोय की काय, या प्रकारची दुर्दैवी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अशी परिस्थिती जगाच्या कोणत्याही सीमेवर आजपर्यंत पाहिली नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
शेतकऱ्यांना भेटू न देणे ही केंद्राची भूमिका दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही दिल्ली येथे वेगवेगळ्या पक्षातील खासदार शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र यावेळी सीमेवरच आम्हाला रोखण्यात आले. अशी परिस्थिती जगाच्या कोणत्याही सीमेवर आजपर्यंत पाहिली नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.