ETV Bharat / state

मोरगाव ते नीरा नरसिंगपूर महामार्गाची होणार सुसज्ज पुनर्निर्मिती..

author img

By

Published : Dec 20, 2020, 12:24 PM IST

हायब्रिड अँन्युटीप्रकल्पातर्गत राज्य शासनाने मोरगाव ते नीरा नरसिंगपूरकडे राष्ट्रीय जाणाऱ्या महामार्गाच्या पुनर्निर्मितीचे काम सुरु केले आहे. यामुळे आता मोरगाव-निरा नरसिंगपूर हा प्रवास जलद व सुखकर होणार आहे.

मोरगाव ते नीरा नरसिंगपूर महामार्गाची होणार सुसज्ज पुनर्निर्मिती..
मोरगाव ते नीरा नरसिंगपूर महामार्गाची होणार सुसज्ज पुनर्निर्मिती..

बारामती- मोरगाव ते नीरा नरसिंगपूरकडे जाणाऱ्या महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. मात्र, आता राज्य शासनाने हायब्रिड अँन्युटीप्रकल्पातर्गत या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच मोरगाव-निरा नरसिंगपूर हा प्रवास जलद व सुखकर होणार आहे.

दर्शनासाठी असंख्य भाविकांची गर्दी-

राज्यभरातील असंख्य भाविक बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मयूरेश्वराचे दर्शन घेऊन इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंहच्या दर्शनासाठी जातात. मात्र मागील काही दिवसांपासून मोरगाव ते नीरा नरसिंगपूर कडे जाणाऱ्या या महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच या महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला भाविकांना सामोरे जावे लागत होते.

मोरगाव ते निरा नरसिंगपूर हे ८६ किमी अंतर..

मोरगाव ते निरा नरसिंगपूर हा ८६ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नीरा नरसिंगपूर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने मुळातच अरुंद होता. त्यातच ठिकाणी ठिकाणी रस्त्यावर खड्डे, अतिक्रमणे आणि अवजड वाहनांच्या पार्कींगमुळे या महामार्गावर आजपर्यंत अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महामार्गसाठी २०४ कोटी ७७ लाख रुपये खर्चास मान्यता....

राज्य सरकारने मागील वर्षी डिसेंबर मध्ये हायब्रिड अँन्युटी प्रकल्पातर्गत हा मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महामार्ग निर्मितीसाठी २०४ कोटी ७७ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महामार्गसंबंधी सर्व प्रशासकीय सोपस्कार प्रक्रिया पूर्ण करत प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या महामार्गावरील तीन धोकादायक वळणे काढून टाकण्यात येणार असून भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सत्याशील नगरारे यांनी दिली.

असा आहे प्रकल्प...

घटक - नवीन - रुंदीकरण - पुनर्बांधणी - जैसे थे

पाईप मोरी - ०० - ०५ - ७८ - ६३

बॉक्स मोरी - ०३ - ०० - ०२ - ०४

लहान पूल - ०६ - ०१ - ०१ - ०३

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.