ETV Bharat / state

अष्टविनायक रांजणगाव महागणपतीची मुखद्वार यात्रा सुरू - गणेशोत्सव 2019

अष्टविनायकातील आठव्या क्रमांकाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या महागणपतीच्या मुखद्वार दर्शन यात्रेला शनिवारपासुन सुरवात झाली आहे. ही यात्रा पुढील सात दिवस सुरू राहणार आहे.

अष्टविनायक रांजणगाव महागणपतीची महाव्दार यात्रा सुरु
author img

By

Published : Sep 1, 2019, 5:06 PM IST

Updated : Sep 1, 2019, 8:11 PM IST

पुणे - अष्टविनायकातील आठव्या क्रमांकाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱया पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या महागणपतीच्या मुखद्वार दर्शन यात्रेला शनिवारपासुन सुरवात झाली आहे. ही यात्रा पुढील सात दिवस सुरू राहणार आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये भाविकांना महागणपतीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेता येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी रांजणगाव या ठिकाणी येत आहेत.

अष्टविनायक रांजणगाव महागणपतीची मुखद्वार यात्रा सुरू

या चार दिवसांमध्ये महागणपतीची पालखी रांजणगाव येथून निघते आणि गणपतीच्या बहिनी असलेल्या कर्डे, निमगाव,गणेगाव, डोक सांगवी या चार गावांमध्ये जाते. गणेश उत्सव काळात आसपासच्या पंचक्रोशीत कुठेही गणपती बसवला जात नाही. एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून महागणपतीचीच सेवा केली जाते. देवस्थान ट्रस्टने यावर्षी मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषनाईने सजवले आहे. पालखी मार्गापुढे संपूर्ण गावात रांगोळीदेखील काढण्यात आली आहे.

रांजणगावचा महागणपती नवसाला पावणारा असल्याचे बोलोले जाते. यात्रा काळात दहा लाखांपेक्षा जास्त भाविक महागणपतीचे दर्शन घेतात. देवस्थान ट्रस्ट भाविकांसाठी सर्व सुविधा पुरवत आहे. त्याचबरोबर, पोलिसांकडूनही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Intro:Anc__अष्टविनायकातील सर्वांत महत्वाचा असलेला आणि आठव्या नंबरचा गणपती म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या महागणपती च्या मुखव्दार दर्शन यात्रेला शनिवार पासुन सुरवात झाली असून, ही यात्रा पुढील सात दिवस सुरू राहणार असून पहिल्या चार दिवसांमध्ये भाविकांना महागणपतीच्या मुर्तींला हात लावून दर्शन घेता येणार आहे.त्यामुळे गणेश भक्तांना हि अनोखी पर्वणीच असून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी रांजणगाव या ठिकाणी येत आहेत.

Byte__डॉ संतोष दुंडे(विश्वास्त देवस्थान ट्रस्ट)

Vo__या चार दिवसाच्या काळा मध्ये रांजणगावच्या महागणपती ची पालखी राजणगाव येथून निघते आणि गणपतीच्या बहीनी असलेल्या कर्डे निमगाव गणेगाव डोक सांगवी या चार गावांमध्ये जातात.गणेश उत्सव काळामध्ये आसपासच्या पंचक्रोशीत कुठेही गणपती बसवला जात नाही एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून महागणपतीचीच नित्यभावे सेवा केली जाते.देवस्थान ट्रस्ट कडून मंदीर विविध रंगी फुलांनी विद्युत रोषनाईने सजवले असून पालखी मार्गापुढे संपुर्ण गावात रांगोळी हि काढली गेली आहे.

Vo__रांजणगाव च्या महागणपती चे विशेष असे महत्व असून भगवान शंकराने त्रिपुरा सुर दैत्याचा वध करण्यासाठी श्री गणेशाची तपाश्रर्या केली आणि श्री गणेशांनी रांजणगाव या ठिकाणी प्रसन्न होवून भगवान शंकरांना वर दिला अशी अख्याईका असून साक्षात भगवान शंकरांनी महागणपती ची स्थापना केली असून राज्यांच्या कानाकोपऱ्यातून दररोज दिड ते दोन लाख भाविक महागणपती चे दर्शन घेत असतात.

Byte__देव महाराज (पुजारी

Vo__रांजणगाव चा महागणपती नवसाला पावणारा गणपती असून यात्रा काळात दहा लाखांपेक्षा जास्त भाविक महागणपती चे दर्शन घेतात.देवस्थान ट्रस्ट कडून भाविकांसाठी सर्व सुविधा पुरवल्या जात असून पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आली आहे

Byte__ संतोष बागडे (भाविक)

Byte__भाविक

End Vo__जर तुम्ही हि या नवसाला पावणा-या गणरायाचे दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर नक्की या पुणे-नगर महामार्गा लगत वसलेल्या या अष्टविनायकातील एक महागणपतीला या...हेच या निमित्ताने सांगावे लागेलBody:...Conclusion:
Last Updated : Sep 1, 2019, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.