पुणे (पिंपरी) - न्यायालाने दखल घेत विनयभंगातील आरोपीला तत्काळ 6 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. यामुळे पीडित महिलेला अवघ्या 36 तासांत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. (Punishment for Molesting a Woman In Pimpri Chinchwad) (दि. 10 डिसेंबर)रोजी महिलेच्या घरात जाऊन आरोपीने विनयभंग केला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करून दोषारोपपत्र तत्काळ दाखल करत न्यायालयात सादर केले होते. (Pimpri Chinchwad Police Action) कामकाज जलदगतीने व्हावे यासाठी पोलिसांकडून सहकार्य करण्यात आले आहे. (सरेशकुमार मोहनलाल वय- 22) अस शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिसात तक्रार दिली होती. सरकारी पक्षातर्फे श्रीमती बोरकर यांनी युक्तिवाद केला.
आरोपीविरोधात 24 तासांत दोषारोपपत्र मोरवाडी येथील न्यायालयात दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 35 वर्षीय महिलेचा सुरेशकुमारने विनयभंग केला होता. यानंतर त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Incident of Molestation of Women in Pimpri Chinchwad) आरोपीने पीडित महिलेच्या घरात जाऊन विनयभंग केला आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास मडके हे करत होते. त्यांनी आरोपीविरोधात 24 तासात दोषारोपपत्र मोरवाडी येथील न्यायालयात दाखल केले. ही कारवाई जलदगतीने करत आरोपीला अवघ्या 36 तासात न्यायलाने 6 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे श्रीमती बोरकर यांनी युक्तिवाद केला.
हेही वाचा - पावसाचे पाणी साचल्याने पिकाची नासाडी, चार एकर अद्रक शेतीवर फिरवला नांगर