पुणे - सध्या विधानसभेचे अवघ्या महाराष्ट्रात बिगुल वाजले असून सर्व पक्षाकडून तयारी सुरू आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघात जनहित लोकशाही या पक्षाकडून तृतीयपंथी निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. नताशा लोखंडे, असे तृतीयपंथीचे नाव असून त्या चिंचवड विधानसभेतून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यांच्यासह इतर चार व्यक्ती निवडणूक लढवणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मावळ विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा - पुण्यात जागावाटपावरून आघाडीत वादाची ठिणगी; पर्वती मतदार संघावर काँग्रेसचा दावा
यावेळी तृतीयपंथी नताशा म्हणाल्या, माझा लढा हा सरकार विरोधी आहे. तृतीयपंथीयांचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे मला ही निवडणूक लढायची असल्याचे त्या म्हणाल्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माघार घेणार नसल्याचे सांगत मीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा - पुण्यात आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा तिढा सुटला